बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळ ! महाराष्ट्रावर काय परिणाम होणार ? राज्यात पाऊस पडणार का ? वाचा….

हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे आगामी काळात महाराष्ट्रातील जवळपास सर्वचं जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. मात्र अशी परिस्थिती असतानाच बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ तयार झाले आहे. तेथे तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे काल, मंगळवारी तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाले अन आज त्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले आहे.

Published on -

Maharashtra Rain : देशातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीची तीव्रता वाढली आहे. महाराष्ट्रात देखील थंडीची लाट आली आहे. महत्त्वाचे म्हणजे येत्या काही दिवसात थंडीची तीव्रता आणखी वाढणार आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे आगामी काळात महाराष्ट्रातील जवळपास सर्वचं जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे.

मात्र अशी परिस्थिती असतानाच बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ तयार झाले आहे. तेथे तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे काल, मंगळवारी तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाले अन आज त्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. हे चक्रीवादळ आज तामिळनाडूच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे.

यामुळे साहजिकच तुम्हाला महाराष्ट्रावर या चक्रीवादळाचा काय परिणाम होणार असा प्रश्न पडला असेल. दरम्यान आज आपण याच संदर्भात माहिती पाहणार आहोत. हवामान खात्यातील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात खोल दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पंबनमध्ये जोरदार वारे वाहत आहेत.

IMD नुसार, कमी दाब क्षेत्र उत्तर-वायव्येकडे सरकण्याची आणि आज चक्री वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सध्या तामिळनाडू राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या चक्रीवादळाचा फक्त तामिळनाडूलाच फटका बसणार असे नाही तर इतरही राज्य या चक्रीवादळामुळे प्रभावित होणार आहे.

मात्र सर्वाधिक फटका तामिळनाडूलाच बसणार आहे. आज पासून पुढील तीन दिवस तामिळनाडूमधील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागराचे चक्रीवादळ तयार झाले आहे त्याला फेंगल असे नाव देण्यात आले आहे.

या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे तामिळनाडू राज्यात अति मुसळधार पाऊस सुरू असून पावसाची तीव्रता पाहता त्या राज्यातील जवळपास 15 हून अधिक जिल्ह्यांमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

तामिळनाडू आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता असून हवामान खात्याने या राज्यांमधील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.

त्यामुळे या राज्यांमधील नागरिकांनी विशेष सतर्क रहावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे. मात्र या चक्रीवादळाचा आपल्या महाराष्ट्रावर कोणताच विपरीत परिणाम होणार नाहीये.

तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकलेल्या या वादळामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर कोणताच परिणाम होणार नाही, राज्यात कुठेच पाऊस पडणार नाही असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी काळजी करू नये असे कृषी क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!