स्पेशल

शिंदे सरकारचा नवीन फंडा ! आता शिक्षकांची बदली होणार नाही? एकाच शाळेत तळ ठोकून बसावं लागणार; दीपक केसरकर म्हणतात…..

Maharashtra Shikshak Badali 2023 : जिल्हा परिषदेतील शिक्षकांसंदर्भात एक मोठ अपडेट हाती आलं आहे. हे अपडेट आहे शिक्षकांच्या बदली संदर्भात. खरं पाहता गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या बदल्या रखडलेल्या आहेत. मध्यंतरी दोन वर्ष कोरोनामुळे आणि आता नवीन ऑनलाइन सॉफ्टवेअर मुळे शिक्षकांच्या बदल्या होत नसल्याचे चित्र आहे.

यामुळे राज्यातील अनेक शिक्षकांच्या माध्यमातून बदल्या लवकरात-लवकर केल्या पाहिजेत अशी मागणी जोर धरत आहे. अशातच आता शिंदे फडणवीस सरकारकडून एक मोठे संकेत मिळाले आहे. यावरून मात्र शिक्षक आणि सरकार आमने-सामने येणार असे चित्र आहे. कारण की शिंदे फडणवीस सरकारने भविष्यात शिक्षकांच्या बदल्या न करण्याचे संकेत दिले आहेत.

हे पण वाचा :- सावधान ! ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; भारतीय हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट जारी

अर्थातच खाजगी शाळांमध्ये ज्या पद्धतीने एकच शिक्षक एकाच शाळेवर कायमस्वरूपी सेवा बजावत असतो, त्याच पद्धतीने जिल्हा परिषदेतील शिक्षकांना देखील एकाच शाळेवर कायमस्वरूपी नोकरी करावी लागणार आहे. या निर्णयामुळे बदल्यांमुळे शिक्षकांची होणारी अनावश्यक धावपळ थांबण्याची शक्यता आहे.

तसेच यामुळे मुलांना चांगले शिक्षण मिळेल असा दावा होत आहे. दरम्यान, शासनाने याबाबत अद्याप अधिकारीक निर्णय घेतलेला नाही. पण राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या संदर्भात एक मोठे विधान केलं आहे. केसरकर यांनी सांगितल्याप्रमाणे, भविष्यात राज्यातील शिक्षकांच्या बदल्या न करण्यासंदर्भात विचार सुरू आहे.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ बहुचर्चित उड्डाणपूलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त हुकला, आता ‘या’ महिन्यानंतर सुरु होणार, पहा….

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत या संदर्भात चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच कॅबिनेटला देखील याबाबत अवगत केले जाणार असून या संदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र शासनाच्या या निर्णयाचे काही शिक्षकांकडून जरी स्वागत होत असले तरी बहुतांशी शिक्षकांनी याचा विरोध केला आहे.

यामुळे एकाच शाळेत आपल संपूर्ण आयुष्य काढावं लागेल असं शिक्षक नमूद करत असून दर तीन वर्षांनी बदल्या करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. निश्चितच अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही. पण, यावर शिंदे सरकार काय निर्णय घेत? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

हे पण वाचा :- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! नवीन आठ ई-शिवाई बस एसटीच्या ताफ्यात दाखल; ‘या’ शहरादरम्यान सुरु होणार सेवा

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts