Maharashtra Tourist Spot : पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि पर्यटकांचे पाय आपसूक पर्यटन स्थळांकडे वळले आहेत. यामुळे सध्या राज्यभरातील पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत आहे.
राज्यासहित संपूर्ण देशभरातील प्रसिद्ध हिल स्टेशनवर पर्यटकांची गर्दी ओसांडून वाहत आहे. दरम्यान, जर तुम्हीही उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कुठे पिकनिक साठी बाहेर पडणार असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे.
खरेतर भारतात अशी काही पर्यटन स्थळे आहेत जी की आपल्या सनसेट पॉईंटसाठी विशेष प्रसिद्ध आहे. सनसेट पॉईंटवर सूर्यास्त पाहण्याची मजा काही औरच असते. तुम्हीही अशा एखाद्या टुरिस्ट डेस्टिनेशनला नक्कीच हजेरी लावलेली असेल.
जिथे तुम्ही सूर्य मावळताना, सूर्यास्त होताना जवळून पाहिले असेल. राज्यातील सापुतारा हिल स्टेशन हे देखील असेच एक हिल स्टेशन असून येथे देखील सूर्यास्ताच्या वेळी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.
येथे जाऊन सनसेट पॉईंटला भेट देऊन सूर्यास्त पाहणे खूपच मजेशीर ठरते. मात्र महाराष्ट्रात असेही एक ठिकाण आहे जिथे सूर्यास्त नाही तर सूर्योदय पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे ते ठिकाण. महाबळेश्वर हे भारतातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. या हिल स्टेशनवर पावसाळ्यात तसेच उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते.
वास्तविक, महाबळेश्वरला बाराही महिने गर्दी असते. या हिल स्टेशनला संपूर्ण देशभरातील पर्यटक हजेरी लावतात. हे हिल स्टेशन येथील सूर्योदयासाठी विशेष प्रसिद्ध आहे. येथील अप्रतिम सुंदरता मनाला मोहणारी आहे.
हे थंड हवेचे ठिकाण खूपच सुंदर आहे. सूर्योदयाच्या वेळी तर महाबळेश्वरची सुंदरता आणखी वाढते. हे थंड हवेचे ठिकाण मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाते. महाबळेश्वर येथील विल्सन पॉईंट येथून सूर्योदयाचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते.
विल्सन पॉईंट हे पर्यटकांमधील आकर्षणाचे केंद्र आहे. विल्सन पॉईंटवर टेहळणी बुरूज आहे, येथून महाबळेश्वर मधील अतिशय मनमोहक अशा निसर्गाचे दर्शन घडते.
यामुळे जर तुम्हीही तुमच्या मित्रपरिवारासमवेत किंवा कुटुंबासमवेत उन्हाळी सुट्ट्या घालवण्यासाठी एखाद्या थंड हवेच्या ठिकाणाला भेट देण्याच्या तयारीत असाल तर महाबळेश्वर हे हिल स्टेशन तुम्ही नक्कीच एक्सप्लोर करू शकता. या मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिल स्टेशनवर नेहमीच पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते.