स्पेशल

सावधान ! अजून अवकाळीच संकट गेलेलं नाही; आज ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, IMDचा अलर्ट जारी

Maharashtra Weather Update : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. वास्तविक गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.

अवकाळी पावसाने आणि गारपीटीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. आधीच शेतकऱ्यांना खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे अपेक्षित अशी कमाई झालेली नाही. आता रब्बी हंगामात देखील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.

मात्र आता शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाने उद्यापासून राज्यात प्रामुख्याने पावसाची उघडीप राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. आज मात्र राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज सहा मे अर्थातच शनिवारी राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पाऊस पडणार आहे.

या विभागात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला असून संबंधित जिल्ह्यात येलो अलर्ट आयएमडीने जारी केला आहे.

कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस?

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या आपल्या नवीनतम हवामान अंदाजानुसार, आज मध्य महाराष्ट्र मधील अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर सोबतच विदर्भ मधील वाशिम, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात भारतीय हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली असून या सर्व जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

निश्चितच हवामान विभागाने उद्यापासून राज्यात पावसाची उघडीप राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला असल्याने यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. वास्तविक सध्या राज्यात लग्न सराईचा हंगाम सुरू आहे. अशातच राज्यात पडणारा हा पाऊस या लगीन सोहळ्यात विघ्न आणण्याचे काम करत आहे.

पावसामुळे लग्नकार्य असलेल्या घरी मोठी धांदल पाहायला मिळाली आहे. अनेक भागात या वादळी पावसामुळे लग्नकार्यात खोळंबा झाला आहे. मात्र आता पावसाची उघडीप राहणार असल्याने लग्नकार्य देखील जोरात होतील अशी आशा आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts