स्पेशल

लालपरीत महिलाराज! महिलांना एसटीमध्ये 50 टक्के तिकीट दरात सवलत; पण यामुळे नाराजगी कायमच, वाचा सविस्तर

Published by
Ajay Patil

Maharashtra Women St Half Ticket : राज्याच्या 2023-24 अर्थसंकल्पात महिलांसाठी काही विशेष योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये St प्रवासात 50 टक्के सवलतीच्या योजनेचा देखील समावेश आहे. आगामी वर्षात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका पाहता महिलांसाठी शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून ही योजना सुरु करण्यात आली आहे. वास्तविक या योजनेची घोषणा अर्थसंकल्पात झाली आहे मात्र याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 17 मार्च 2023 पासून सुरु आहे.

शासनाने सुरू केलेल्या या योजनेचा महिलांना फायदा होत असून शिंदे फडणवीस सरकारचे या निमित्ताने महिलांकडून आभार मानले जात आहे. शासनाच्या या योजनेचा निश्चितच महिलांना फायदा होत आहे. शिवाय आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाला देखील यामुळे मोठा दिलासा मिळत आहे. दरम्यान आज आपण या योजनेची सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- एसटी कर्मचाऱ्यांना मराठी नवीन वर्षात मिळणार ‘ही’ भेट; महामंडळाने घेतला निर्णय

कस आहे योजनेच स्वरूप

या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना एसटी महामंडळाच्या सर्व बसेस मध्ये 50% तिकीट दरात सवलत दिली जाणार आहे. म्हणजे साधी, मिनी बस, निमआराम म्हणजेच एशियाड गाडी, विनावातानुकुलित शयनयान, शिवशाही, शिवनेरी, शिवाई या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये महिलांना सवलत राहणार आहे.

या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या तिकिटाच स्वरूप मात्र बदल राहील. म्हणजे तिकिटाच्या रंगसंगतीत बदल राहील अशी माहिती समोर आली आहे.

जरी महिलांना एसटीच्या प्रवासात 50 टक्के सवलत मिळत असली तरी देखील महिला प्रवाशांकडून भाड्यातील अपघात साहाय्यता निधी आणि एसी बससेवांकरीता वस्तु व सेवाकरची रक्कम आकारणी जाणार आहे. म्हणजेच जर एखाद्या स्टॉपचे भाडे 20 रुपये असेल तर महिलांना तिकीट दरात दहा रुपयाची सवलत मिळेल आणि त्यावर कर म्हणून चार रुपये द्यावे लागतील म्हणजेच महिलांना 14 रुपयाचे तिकीट लागणार आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्याचा सूर्यफूल लागवडीचा प्रयोग ठरला फायदेशीर; 3 महिन्यात झाली 2 लाखांची कमाई

ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू राहील पण महाराष्ट्राबाहेर या योजनेचा लाभ मिळणार नाही.

ही सवलत शहरी वाहतुकीसाठी लागू राहणार नाही.

यासोबतच रिझर्वेशन ने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना याचा लाभ मिळणार नाही.

तसेच पाच ते बारा वयोगटात येणाऱ्या मुलींना देखील याचा लाभ मिळणार नाही. कारण की या वयोगटात मोडणाऱ्या मुलींना आधीच सवलत ही दिली जात आहे.

यासोबतच ज्या महिला 75 प्लस वयोगटात मोडतात त्या महिलांना 100% तिकीट दरात सवलत राहणार आहे म्हणजेच मोफत प्रवास त्यांना करता येणार आहे.

हे पण वाचा :- पंजाबरावांचा एप्रिल महिन्यातील हवामान अंदाज ! ‘या’ तारखेला मुसळधार पाऊस पडणार, कोणत्या जिल्ह्यात राहणार अवकाळी?, पहा….

आता नाराजगी कशामुळे?

वास्तविक महिलांसाठी सुरू केलेल्या या योजनेला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शासनाने ही योजना महिलांसाठी कल्याणकारी असल्याचा दावा केला आहे. पण महिला वाढत्या महागाई वर नाराज आहेत. महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये तिकीट सूट देऊन आमचं काही भागणार नाही. महागाई वाढली आहे त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरमध्ये सूट द्या. सर्व सामान्य माणसाला घरगुती गॅस सिलेंडर खरेदी करणं अवघड झालं आहे. अव्वाच्या सव्वा किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे आम्ही काय करायचं असा प्रश्न यावेळी काही महिलांनी उपस्थित केला आहे.

हे पण वाचा :- नोकरीला भारी शेती ! पुण्याच्या शेतकऱ्याचा कोथिंबीर लागवडीचा प्रयोग यशस्वी; अर्धा एकरात एक लाखाची कमाई

Ajay Patil

Published by
Ajay Patil