स्पेशल

राज्यातील महिलांसाठी महत्वाची बातमी ; एसटीच्या हाफ तिकीटाबाबत एसटी महामंडळाने केले ‘हे’ महत्वाचे काम, आता….

Maharashtra Women St Half Ticket : यंदाच्या अर्थसंकल्पात शिंदे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी विविध योजनांची घोषणा केली.

यामध्ये महिलांसाठी एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्याचे देखील घोषणा करण्यात आली. शिंदे सरकारने एसटी तिकीट दरात 50 टक्के सवलत दिली आणि एसटीच्या महसुलात देखील मोठी वाढ झाली आहे.

या योजनेची घोषणा जरी अर्थसंकल्पात झाली असली तरी देखील योजनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी 17 मार्च 2023 पासून करण्यात आली आहे. 17 मार्चपासून राज्यातील सर्व महिलांना एसटीच्या प्रवासात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे.

हे पण वाचा :- गुंतवणूकदार बनलेत मालामाल ! ‘हा’ 5 रुपयाचा स्टॉक पोहचला 590 रुपयावर, 78 हजाराचे बनलेत 1 कोटी; पहा डिटेल्स

दरम्यान आता महिलांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आता एसटीचे हाफ तिकीट महिलांना घरूनच बुक करता येणार आहे. खरं पाहता गेल्या काही दिवसांपासून एसटीचे ऑनलाईन तिकीट बुक करताना प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

मात्र आता या ऑनलाइन तिकीट बुकिंग च्या प्रणाली मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. म्हणजे आता घरी बसून एसटीच्या प्रवाशांना तिकीट बुक करता येणार आहे.

एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला सन्मान योजनेचे हाफ तिकीट बुकिंग करताना महिलांना अडचणी येत होत्या. याबाबत अनेक महिला प्रवाशांनी तक्रारी केल्या.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! म्हाडाच्या कोकण मंडळाची पुन्हा नवीन सोडत निघणार; डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार येथे घर होणार उपलब्ध, केव्हा निघणार जाहिरात?

या पार्श्वभूमीवर आता एसटी महामंडळाकडून एसटीच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यामुळे आता ऑनलाइन तिकीट बुकिंग करता येणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या हाफ तिकीट योजनेमुळे एसटी महामंडळाला दिवसाला नऊ कोटींचे उत्पन्न मिळत आहे.

दरम्यान आता महिलांना घरी बसूनच एसटीचे हाफ तिकीट बुक करता येणार असल्याने या योजनेला आणखी प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे एसटीच्या महसुलात वाढ होणार असून महिलांना देखील याचा फायदा होणार आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘अस’ झालं तर तालुका कृषी अधिकारी राहणार जबाबदार, राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts