स्पेशल

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना : आता 5 लाखांपर्यंत मिळणार मोफत उपचार; अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ 45 रुग्णालयात आहे सुविधा

Published by
Ajay Patil

Mahatma Jyotirao Phule Jan arogya Yojana : शिंदे फडणवीस सरकारने नुकताच आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन निर्णयानुसार आता या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार नागरिकांना मिळणार आहेत. खरं पाहता आत्तापर्यंत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात होते.

मात्र आता यामध्ये तीन लाख रुपयांची वाढ झाली असून आता पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. या योजनेअंतर्गत राज्यातील काही शासकीय रुग्णालयात आणि काही खाजगी रुग्णालयात उपचार दिले जाणार आहेत. शासनाने निवडून दिलेल्या रुग्णालयातच मात्र मोफत उपचार या ठिकाणी मिळणार आहेत. दरम्यान आज आपण या योजनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना

या योजनेला राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना म्हणून 2017 पर्यंत ओळखलं जात होतं. यानंतर भाजपा शासनाने या योजनेचे नामकरण महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असे केलं. ही योजना आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकातील नागरिकांना मोफत उपचार देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जवळपास 1209 आजारांवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया करण्याचे प्रावधान आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 2 लाख पर्यंतचे उपचार मोफत केले जात होते मात्र आता या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत होणार आहेत. निश्चितच यामुळे नागरिकांना मोठा फायदा होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ कोणाला

ही योजना आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या घटकांसाठी सुरू झाली आहे. राज्यातील पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक नागरिकांना या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत घेता येणार आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेअंतर्गत ज्या रुग्णालयात मोफत उपचार दिले जातात त्या रुग्णालयात या योजनेचे आरोग्य मित्र नियुक्त केलेले असतात. हे आरोग्य मित्र नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यास मदत करतात.

अहमदनगर जिल्ह्यात इतक्या रुग्णालयात होतात मोफत उपचार

अहमदनगर जिल्ह्यातही या योजनेअंतर्गत मोफत उपचार नागरिकांना दिले जातात. एका आकडेवारीनुसार जिल्ह्यातील जवळपास दोन लाख लोकांनी या योजनेअंतर्गत मोफत उपचार घेतले आहेत. सप्टेंबर 2018 ते फेब्रुवारी 2023 पर्यंत जिल्ह्यातील एक लाख 99 हजार 704 आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकातील लोकांनी या योजनेअंतर्गत मोफत उपचार घेतले आहेत. जिल्ह्यात या योजनेअंतर्गत एकूण 45 रुग्णालयात मोफत उपचार पुरवले जात आहेत. यामध्ये तीन शासकीय रुग्णालय दोन मेडिकल कॉलेज आणि 40 खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील या रुग्णालयात मिळतो मोफत उपचार

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील

  • अमृतवाहिनी रुरल हॉस्पिटल संगमनेर
  • आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड एम आर सी, अहमदनगर
  • सिटी केअर हॉस्पिटल अहमदनगर
  • सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर
  • देशपांडे हॉस्पिटल अहमदनगर
  • धन्वंतरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल, संगमनेर
  • डॉक्टर इथापे हॉस्पिटल संगमनेर
  • गरुड हॉस्पिटल अँड कॅन्सर सेंटर अहमदनगर
  • कुटे हॉस्पिटल अँड लॅप्रोस्कोपी सेंटर संगमनेर
  • नाईक पेडियाट्रीक सेंटर अहमदनगर
  • नोबल हॉस्पिटल and रिसर्च सेंटर अहमदनगर
  • ओंकार हॉस्पिटल, सुपा, पारनेर
  • पाटील हॉस्पिटल अहमदनगर
  • PDVVP Foundations Dr Vikhe Patil Memorial Hospital And Medical College अहमदनगर
  • प्रवरा रुरल हॉस्पिटल राहता
  • रामेश्वर हॉस्पिटल जामखेड
  • संजीवनी हॉस्पिटल श्रीगोंदा
  • श्री हॉस्पिटल एक्सीडेंट अँड सुपर स्पेशालिटी पाथर्डी
  • श्री साईबाबा हॉस्पिटल शिर्डी राहता
  • श्री शनेश्वर ग्रामीण रुग्णालय शनिशिंगणापूर नेवासा
  • सुंदर नेत्रालय अहमदनगर
  • स्वास्थ्य हॉस्पिटल मेडिकल रिसर्च सेंटर अहमदनगर
  • तांबे हॉस्पिटल संगमनेर
  • THE SALVATION ARMY EVANGELINE BOOTH HOSPITAL अहमदनगर
  • V.J M.A.T.S आत्मा मलिक हॉस्पिटल कोपरगाव
Ajay Patil

Published by
Ajay Patil