स्पेशल

शेतकऱ्यांच्या आवडत्या स्कार्पिओ आणि बोलेरो कार येणार आता इलेक्ट्रिक रूपात; कधीपर्यंत येतील बाजारात आणि काय असतील वैशिष्ट्ये?

Published by
Ajay Patil

महिंद्रा अँड महिंद्रा ही वाहन उत्पादक क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण आणि अग्रगण्य अशी कंपनी असून या कंपनीच्या माध्यमातून अनेक कार तसेच व्यावसायिक वाहनांपासून ट्रॅक्टर पर्यंतच्या वाहनांचे उत्पादन केले जाते. कारच्या दृष्टिकोनातून बघितले तर महिंद्रा कंपनीने स्कार्पिओ आणि बोलेरो सारखे कार भारतात लॉन्च केले आणि तेव्हापासून या कार थेट शेतकऱ्यांपासून तर  श्रीमंत लोकांपर्यंत लोकप्रिय अशा आहेत.

परंतु आता याच दोन्ही कार म्हणजेच स्कार्पिओ आणि बोलेरो या इलेक्ट्रिक स्वरूपामध्ये आता महिंद्रा कंपनी लॉन्च करेल अशी माहिती सध्या समोर आलेली आहे. एवढेच नाही तर महिंद्रा कंपनी 2030 पर्यंत भारतामध्ये सात नवीन इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करणार असून यामध्ये इलेक्ट्रिक बोलेरो आणि स्कॉर्पिओ या कारचा समावेश असणार आहे.

एवढेच नाही तर या नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही ला  Scorpio.e आणि Bolero.e असे नाव देण्यात आले आहे व या संबंधीची माहिती महिंद्रा कंपनीने शुक्रवारी झालेल्या बैठकीत दिलेली आहे. याबाबत कंपनीने पुष्टी केली आहे की बोलेरो आणि स्कार्पिओ देखील आता इलेक्ट्रिक स्वरूपामध्ये बनणार आहेत व या मॉडेलच्या नावांमध्ये ‘e’ हा प्रत्यय जोडला जाणार आहे. जसे यापूर्वी लॉन्च झालेल्या पेट्रोल टू इलेक्ट्रिक मॉडेल्स  XUV.e आणि Thar.e त्याचप्रमाणे या वाहनांसोबत देखील e हा प्रत्यय जोडला जाणार आहे.

Bolero.e सध्याच्या बोलेरोपेक्षा किती वेगळी असेल?

महिंद्रा कंपनीच्या माध्यमातून महिंद्रा Thar.e ही संकल्पना गेल्या ऑगस्टमध्ये बाजारात आणली होती व ती महिंद्राच्या इंडिया ग्लोबल स्टेट बोर्ड प्लेट फॉर्मची सुधारित आवृत्ती होती व याचे सांकेतिक नाव P1असे होते. या प्लॅटफॉर्मचा व्हिलबेस 2775 मीमी ते 2975 मिमी दरम्यान असेल. येऊ घातलेली इलेक्ट्रिक स्कार्पिओ आणि बोलेरो मध्ये देखील याचा वापर केला जाण्याची शक्यता आहे

व सध्याच्या जनरेशनचा बोलेरो चा व्हिलबेस जर पाहिला तर तो 2680 मीमी आहेत तर स्कॉर्पिओ  N चा व्हिलबेस 2750 मिमी आहे. तसेच महिंद्राच्या इतर ईव्ही प्रमाणे येऊ घातलेले हे नवीन मॉडेल देखील त्यांचे बॅटरी पॅक आणि मोटर्स सामायिक करू शकतात. Thar.e संकल्पनेमध्ये 109 एचपी/ 135 एनएम फ्रंट आणि 286 एचपी/ 535 एनएम मागील मोटर्स होत्या.

ज्यामुळे त्या AWD क्षमता देते. या बॅटरीचे वैशिष्ट्ये 60kWh किंवा 80kWh पॅक पर्यंत असू शकतात. ज्यामध्ये पूर्वीची 325 किमीची WLTP श्रेणी आणि नंतरची 435- 450 किमीची श्रेणी आहे.

 2030 पर्यंत महिंद्रा लॉंच करणार नवीन सात इलेक्ट्रिक वाहने

Scorpio.e आणि बोलेरो e लॉन्च करण्याबद्दल अजून कोणतीही माहिती नाही परंतु महिंद्राने सांगितले आहे की 2030 पर्यंत सात नवीन इलेक्ट्रिक vahne लाँच करणार आहेत. त्यामुळे स्कार्पिओ आणि बोलेरो इलेक्ट्रिक यांच्यामध्ये सामील होऊ शकते. तसेच 2026 मध्ये अपेक्षित असलेल्या पुढच्या पिढीतील महिंद्रा बोलेरो ला देखील नवीन रूप देण्यात येणार आहे. यामध्ये पहिले मॉडेल बहुदा पुढील पिढीचे बोलेरो असण्याची शक्यता आहे व जे 2026-27 पर्यंत येण्याची अपेक्षा आहे.

Ajay Patil