Mahindra BE6 And XEV 9 Booking : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला आहे आणि हेच कारण आहे की आता ऑटो दिगज कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रोडक्शनवर विशेष लक्ष देत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांचे प्रोडक्शन आता ऑटो दिग्गज कंपन्यांकडून वाढवण्यात आले आहे.
सध्या इलेक्ट्रिक सेगमेंटचा विचार केला असता भारतीय मार्केटमध्ये टाटा कंपनीचा विशेष बोलबाला पाहायला मिळतो. मात्र आता टाटा कंपनीची ही मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी इतरही कंपन्यांनी कंबर कसली आहे.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी महिंद्रा अँड महिंद्रा या लोकप्रिय कंपनीने आपल्या दोन बहुचर्चित इलेक्ट्रिक एसयुव्ही लॉन्च केल्या आहेत. दरम्यान जर तुम्हीही येत्या काही दिवसांनी नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी महिंद्राकडून एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे.
महिंद्राने अलीकडेच लाँच केलेल्या आपल्या दोन नव्या इलेक्ट्रिक SUV म्हणजेच BE 6 आणि XEV 9e साठी बुकिंग सुरू केली आहे. विशेष म्हणजे, यातील महिंद्रा BE 6 ला भारत NCAP कडून क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे.
आता आपण या गाड्यांची बुकिंग अधिकृतरीत्या आज पासून सुरू होणार असली तरी देखील डिलिव्हरी कधीपासून सुरू होणार याबाबत नेमके काय अपडेट हाती आले आहे याचा आढावा घेऊयात.
डिलिव्हरी कधी सुरू होणार ?
महिंद्राने बुकिंगच्या आधीच हजारो गाड्या डीलरशिप पर्यंत पोहोचवल्या आहेत. कंपनीने जानेवारी 2025 दरम्यान या दोन्ही मॉडेल्सच्या 1,837 युनिट्स डीलरशिपपर्यंत पोहोचवल्या होत्या.
मात्र असे असले तरी या गाड्यांच्या टॉप-रेंज वेरिएंटची डिलिव्हरी मार्चच्या मध्यात सुरू होणार आहे. तर इतर वेरिएंट्सची डिलिव्हरी जून ते ऑगस्ट 2025 दरम्यान सुरू होईल, अशी माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर येत आहे.
किंमत किती आहे?
भारतीय बाजारात महिंद्रा BE 6 ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 18.90 लाख रुपयांपासून सुरू होते आणि ती 26 लाख रुपयांपर्यंत जाते. त्याचबरोबर, महिंद्रा XEV 9e ची सुरवातीची एक्स-शोरूम किंमत 21.90 लाख रुपये असून ती 30.50 लाख रुपयांपर्यंत जाते.
682 किमीपर्यंतची दमदार रेंज
महिंद्राच्या या दोन्ही ई-एसयूव्हीमध्ये 59kWh आणि 79kWh बॅटरी पॅकचे पर्याय देण्यात आले आहेत. BE 6 इलेक्ट्रिक SUV 556 किमी ते 682 किमीपर्यंतची रेंज देते, तर XEV 9e 542 किमी ते 656 किमीपर्यंतची रेंज ऑफर करते. महिंद्राच्या या नवीन इलेक्ट्रिक SUV मॉडेल्समुळे भारतीय ईव्ही बाजारात मोठी स्पर्धा निर्माण होणार असून ग्राहकांसाठी उत्तम पर्याय उपलब्ध होणार आहेत.
या दोन्ही गाड्यांमध्ये असे भन्नाट फीचर्स इनबिल्ड करण्यात आले आहेत ज्यामुळे या गाड्या ग्राहकांच्या पसंतीस खऱ्या उतरतील अशी आशा कंपनीकडून व्यक्त होत आहे. यामुळे आता ग्राहकांकडून या दोन्ही SUVs ला कसा प्रतिसाद मिळतो ही गोष्ट विशेष पाहण्यासारखी ठरणार आहे.