स्पेशल

उन्हाळी हंगामात मक्याची लागवड करणार आहात का? मग या पाच जातींची निवड करा!

Published by
Tejas B Shelar

Maize Farming : उन्हाळी मका लागवड करणाऱ्यांसाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. मका हे खरीप रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामांमध्ये उत्पादित होणारे एक महत्वाचे पीक आहे.

महाराष्ट्रात या पिकाची लागवड रब्बी आणि उन्हाळी हंगामाच्या तुलनेत खरीप हंगामात अधिक होते. मात्र असे असले तरी मान्सून 2024 मध्ये महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला असल्याने उन्हाळी हंगामातही मका लागवड यंदा विशेष उल्लेखनीय राहील असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे.

मका लागवडी बाबत बोलायचं झालं तर खरीप हंगामात या पिकाची 15 जून ते 15 जुलै या एका महिन्याच्या कालावधीत लागवड केली जाते. रब्बी हंगामाबाबत बोलायचं झालं तर 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या एका महिन्याच्या कालावधीत लागवड केली जाते.

उन्हाळी हंगामात मक्याचे लागवड ही एक जानेवारी ते 15 फेब्रुवारी या काळात केली जाते. अर्थातच उन्हाळी हंगामातील मक्याची लागवड गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून 15 फेब्रुवारी पर्यंत याची लागवड होणार आहे.

अशा परिस्थितीत आज आपण उन्हाळी हंगामात लागवडीसाठी उपयुक्त असणाऱ्या मक्याच्या काही सुधारित जातींची माहिती पाहणार आहोत. मंडळी खरीप हंगामात मक्याची सपाट जमिनीवर पेरणी करता येणे शक्य आहे मात्र रब्बी हंगामात सरीवरंबा पद्धतीने मक्याचे पेरणी केल्यास अधिक चे उत्पादन मिळते असा दावा कृषी तज्ञांनी केला आहे.

दरम्यान उशिरा व मध्यम कालावधीच्या जातीसाठी ७५ x २० सेंमी एवढे अंतर ठेवणे आवश्यक आहे तसेच लवकर पक्व होणाऱ्या जातींसाठी अंतर ६० x २० सेंमी एवढे असायला हवे असा सल्ला देण्यात आला आहे. आता आपण उन्हाळी हंगामात लागवड करता येतील अशा काही मक्याच्या जातींची माहिती पाहूयात.

या जातींची उन्हाळी हंगामात लागवड करता येणे शक्य आहे
उन्हाळी हंगामात मक्याची लागवड करायची असेल तर राज्यातील शेतकरी बांधव ऍडव्हान्टा 756, Pioneer P3401, DNH 8255 TATA, NK 30 Syngenta, PAC 751, DEKALB, NK 6240 Syngenta, P3502 Pioneer या जातींची निवड करू शकता.

या जाती उन्हाळी हंगामासाठी सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा कृषी तज्ञांनी केला आहे. त्यामुळे यापैकी कोणत्याही एका जातीची निवड करून शेतकरी बांधव उन्हाळी हंगामातून चांगले उत्पादन मिळवू शकतील असा विश्वास आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar