Maize Farming : मका हे भारतात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक. या पिकाची दुहेरी उद्देशाने लागवड केली जाते. चारा आणि धान्य उत्पादनासाठी मक्याची लागवड होते. राज्यातील जवळपास 36 जिल्ह्यांमध्ये हे पीक उत्पादित होते. पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात याची मोठ्या प्रमाणात लागवड होते.
खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांमध्ये मक्याची शेती केली जाते. दरम्यान आज आपण रब्बी हंगामासाठी उपयुक्त असणाऱ्या मक्याच्या एका सुधारित जातीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये मक्याची लागवड करायची असेल त्यांच्यासाठी हा लेख कामाचा ठरणार आहे. खरंतर भारतीय शास्त्रज्ञांनी देशातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी विविध पिकांचे नवनवीन वाण विकसित केले आहेत.
भारतीय शास्त्रज्ञांनी मक्याचे देखील अनेक वाण विकसित केले आहेत. भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी देखील मक्याचे अनेक वाण विकसित केले असून आज आपण याच संस्थेच्या एका सुधारित जातीची माहिती पाहणार आहोत.
भारतीय कृषी संशोधन संस्थेने अलीकडेच डीएमआरएच 1301 ही मक्याची एक नवीन जात विकसित केली आहे. हि मक्याची सुधारित जात असून राज्यातील अनेक प्रमुख मका उत्पादक राज्यांमध्ये या जातीची शिफारस करण्यात आली आहे.
भारतीय शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे मक्याची ही जात पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये लागवडीसाठी शिफारशीत आहे.
या जातीची रब्बी हंगामात लागवड केली जाऊ शकते. हा एक मध्यम कालावधीचा संकरित मका वाण आहे. मक्याची हि संकरित जात शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. या जातीच्या मक्याचे दाणे हे आकर्षक अन पिवळे असतात.
हि जात करपा आणि खोड कुजव्या रोगास मध्यम प्रतिकारक असल्याचा दावा कृषी शास्त्रज्ञांनी केला आहे. ही एक उच्च उत्पन्न देणारी अन भारतीय हवामानात तग धरणारी जात आहे.
हा संकरीत वाण शेतकऱ्यांना 6.5 ते 10.5 टन/हेक्टर उत्पादन देते. म्हणजे या जातीपासून 100 क्विंटल प्रति हेक्टरपेक्षा जास्त उत्पादन मिळू शकते. मात्र यासाठी पिकाचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.