स्पेशल

डेटा सायन्समध्ये करिअर करा आणि मिळवा 10 ते 12 लाखापर्यंतचे पॅकेज! ‘हे’ अभ्यासक्रम ठरतील फायद्याचे

Published by
Ajay Patil

Career In Data Science:- तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये तंत्रज्ञान आणि कौशल्य आधारित अभ्यासक्रमांना खूप महत्त्व असून अशा अभ्यासक्रमामध्ये पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या संधी उपलब्ध होताना दिसून येत आहेत. त्यामुळे रुळलेल्या त्याच त्याच अभ्यासक्रमांच्या मागे न जाता काळानुसार अभ्यासक्रमाची निवड करणे हे खूप महत्त्वाचे ठरणार आहे.

या अनुषंगाने जर आपण डेटा सायन्सचा विचार केला तर हे एक वेगाने विकसित होणारे क्षेत्र असून येणाऱ्या कालावधीत या क्षेत्रामध्ये नोकरीच्या मोठ्या संधी निर्माण होण्याची शक्यता असल्याने डेटा सायन्स मधील अभ्यासक्रम पूर्ण करणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे.

यामध्ये प्रामुख्याने मशीन लर्निंग तसेच सांख्यिकी आणि अल्गोरिदम इत्यादी तत्वे एकत्र करून साधारणपणे डेटा सायन्स हा अभ्यासक्रम बनवण्यात आलेला आहे. देशामध्ये आणि जगात डेटाचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे व त्यामुळे डेटा सायंटिस्ट, डेटा अनालिटिक्स, डेटा आर्किटेक्ट,

डेटा एक्सपर्ट आणि इतर क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये देखील आता वाढ होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात डेटा सायन्सशी संबंधित अभ्यासक्रमामध्ये पदवी किंवा डिप्लोमा ज्या विद्यार्थ्यांनी केलेला असेल त्यांना नोकरीच्या अगणित संधी उपलब्ध होतील यात शंकाच नाही.

 हे आहेत डेटा सायन्सशी निगडित महत्त्वाचे अभ्यासक्रम

1- बी.टेक( डेटा सायन्स)- हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना बारावीनंतर करता येऊ शकतो. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी डेटा सायन्समध्ये चार वर्षाचे बीटेक करू शकतात. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना डेटाशी निगडित असलेले टूल्स आणि डेटाशी निगडित असलेल्या महत्त्वाच्या पद्धती शिकवल्या जातात. ज्यामुळे विद्यार्थी डेटा वापरण्यास शिकू शकतात.

2- बीसीए बारावीनंतर विद्यार्थी हा अभ्यासक्रम करू शकतात व हा तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम आहे. यामध्ये ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना संगणक आणि गणित शास्त्राचा अभ्यासक्रम शिकवला जातो.

3- बीएससी इन डेटा सायन्स बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना हा तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम करता येऊ शकतो. बीएससी इन डेटा सायन्समध्ये विद्यार्थ्यांना कम्प्युटर आणि व्यवसायासोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्स बाबत महत्त्वाच्या बाबी शिकवल्या जातात.

4- डिप्लोमा इन डेटा सायन्स बारावी नंतर विद्यार्थी डेटा सायन्समध्ये डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स देखील करू शकतात. जर विद्यार्थ्यांनी डेटा सायन्समध्ये डिप्लोम्याला किंवा सर्टिफिकेट कोर्सेसला ऍडमिशन घेतले तर विद्यार्थ्यांना यामध्ये डेटा सायन्स आणि डेटा अनालिटीक्सचे प्रशिक्षण दिले जाते.

 डेटा सायन्स मधील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर किती पगाराची मिळू शकते नोकरी?

डेटा सायन्स क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांना खूप चांगला पगार मिळतो. या क्षेत्राशी संबंधित जितका जास्तीचा अनुभव तुम्हाला असेल तितका चांगला पगार यामध्ये मिळतो. तरी देखील सुरुवातीला मिळणारे पॅकेज पाहिले तरी चार ते बारा लाख रुपये पर्यंतचे वार्षिक पॅकेज यामध्ये मिळते.

परंतु या क्षेत्रामध्ये जसा जसा तुमचा अनुभव वाढत जातो तसा तसा तुमचा पगार दुप्पट ते चौपट होतो. साधारणपणे 10 ते 20 लाख रुपये वार्षिक पॅकेज यामध्ये आरामात मिळते. जेव्हा तुम्हाला या क्षेत्राचा जास्तीचा अनुभव असतो तेव्हा तुम्हाला वार्षिक वीस ते चाळीस लाख रुपयापर्यंतचे देखील पॅकेज मिळते.

 अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये आता शिकवला जातो डेटा सायन्स अभ्यासक्रम

जर आपण डेटा सायन्स अभ्यासक्रमाची व्याप्ती पाहिली तर ती खूप मोठी असून यातील अनेक नामांकित शैक्षणिक संस्था आणि ई लर्निंग प्लॅटफॉर्मने एआयचे महत्व लक्षात घेऊन डेटा सायन्स आणि बिझनेस अनॅलिटिक्स मधील प्रशासकीय अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

यामध्ये अगदी सामाजिक विज्ञान आणि व्यवस्थापन असणाऱ्या शाळांनी देखील डेटा सायन्स अभ्यासक्रम समाविष्ट केला आहे. देशातील आयआयटी तसेच आयआयएम आणि एनआयटी सारख्या संस्थांमध्ये देखील डेटा सायन्स अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेले आहेत.

Ajay Patil