Tourist Places In North-East:- भारतामध्ये प्रत्येक राज्यात तुम्हाला निसर्गाने मुक्त उधळण केलेली पर्यटन स्थळे पाहायला मिळतात. तुम्ही भारतातील कुठल्याही राज्यात जरी गेला तरी तुम्हाला पर्यटन स्थळांची कमी भासत नाही. त्यामुळे बरेचजण आपापल्या परीने आणि बजेटनुसार ट्रिप प्लान करतात व वेगवेगळ्या राज्यांमधील असलेल्या पर्यटन स्थळांना भेट देत असतात.
अशा निसर्ग सौंदर्याने समृद्ध असलेल्या पर्यटन स्थळांना भेट देणे हे तितकेच महत्त्वाचे देखील असते. कारण दररोजच्या त्याच त्याच जीवनशैलीला व्यक्ती कंटाळतो आणि थोडंसं काहीतरी वेगळ्या जीवनाचा अनुभव घ्यावा या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायचा प्लान बनवतो व छोटीशी ट्रिप आयोजित केली जाते.
अशाप्रकारे तुम्हाला देखील जर तुमचे कुटुंब किंवा मित्रांसोबत फिरायला जायचा प्लान असेल तर तुम्ही उत्तर पूर्व भारतातील म्हणजेच नॉर्थ ईस्ट मधील मेघालय राज्याची राजधानी असलेल्या शिलॉंगला जाऊ शकतात. शिलॉंग हे निसर्ग सौंदर्याने मोठ्या प्रमाणावर समृद्ध असून या ठिकाणी देशातीलच नव्हे तर विदेशी पर्यटक देखील मोठ्या प्रमाणावर भेट देतात.
या ठिकाणी असलेल्या डोंगर दर्या तसेच झरे, मोकळी असलेली मोठ-मोठी मैदाने पाहण्याची मजा काही औरच असते. तसेच या ठिकाणाची स्थानिक परंपरा आणि परिस्थिती पाहणे देखील एक वेगळाच अनुभव देऊन जाते. त्यामुळे या लेखामध्ये शिलॉंगला जर तुम्ही गेला तर कोणकोणते ठिकाणे पहावीत? याबद्दलची माहिती बघणार आहोत.
शिलॉंगला गेल्यावर हे ठिकाणे नक्कीच पहा
1- एलिफंट फॉल्स- शिलॉंग पासून 12 किलोमीटरवर एलिफंट फॉल्स असून या धकाधकीच्या आणि आधुनिक जीवनशैली पासून जर तुम्हाला दूर जाऊन काही क्षण आनंदात व्यतीत करायचे असतील तर हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरते. एलिफंट धबधबा तुम्हाला तीन स्टेपमध्ये पाहायला मिळतो.
या धबधब्यापर्यंत जर तुम्हाला पोहोचायचे असेल तर पहिल्या टप्प्यापर्यंत तुम्ही चालत जाऊन पोहोचतात. परंतु दुसरा टप्प्यात पोहोचण्यासाठी तुम्हाला हॅकिंग करावे लागते आणि तिसऱ्या टप्प्यात जाणे खूप कठीण आहे.
या ठिकाणी पोहोचणे म्हणजे साहसाने भरलेले असे काम असून या ठिकाणी असलेल्या एका नैसर्गिक पुलाच्या माध्यमातून तुम्ही जाऊ शकतात किंवा बोटिंग करू शकतात. या ठिकाणी गेल्यावर त्या ठिकाणाचे कल्चरल कपडे तसेच हायकिंग व उत्तम फोटोग्राफीचा आनंद घेऊ शकतात.
2- पोलीस बाजार- हे एक शिलॉंग येथील मुख्य बाजारपेठ असून या ठिकाणी येणारे जे काही पर्यटक आहेत त्यांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. या ठिकाणी भेट दिल्यानंतर तुम्ही हवी ती शॉपिंग मनसोक्त करू शकतात. हँडीक्राफ्ट म्हणजेच हस्तकलेतून निर्माण केलेल्या वस्तू, ज्वेलरी इत्यादी युनिक वस्तू तसेच खानपानाच्या अनेक वस्तू देखील खरेदी करू शकतात.
3- शिलॉंग पीक- हे ठिकाण एयर फोर्स बेसवर असून या ठिकाणी जाण्याकरिता तुम्हाला ओळखपत्राची गरज भासते. तुम्ही जर शिलॉंग पिकला गेला तर तुम्ही संपूर्ण शिलॉंग शहराचा पॅनोरेमिक व्ह्यू पाहू शकतात व त्यामुळे या ठिकाणी पर्यटक नक्कीच भेट देतात.
4- डॉन बॉस्को म्युझियम- हे म्युझियम सात मजली असून अत्यंत सुंदर असे आहे. तुम्हाला भारतातील संपूर्ण नॉर्थ ईस्टची संस्कृती या ठिकाणी माहिती होते. या ठिकाणाची संस्कृती तसेच परंपरा व लाईफस्टाईल आणि इतिहास देखील तुम्हाला पाहता येतो. त्यामुळे डॉन बॉस्को म्युझियमला आशियातील सर्वात मोठे कल्चरल म्युझियम असे देखील म्हटले जाते.
5- लेडी हैदरी पार्क- शिलॉंग शहराच्या अगदी मध्यवर्ती भागामध्ये हा पार्क आहे. तुम्हाला जर काही क्षण निवांत आणि शांततेत घालवायचे असतील तर लेडी हैदरी पार्कला भेट देणे नक्कीच फायद्याचे ठरेल.
अनेक वेगवेगळ्या प्रकारची फुले तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात व छोटेसे प्राणी संग्रहालय देखील तुम्हाला या ठिकाणी पाहता येते. तुमच्या सोबत जर लहान मुले असतील तर त्यांच्यासाठी हे पार्क खास डेस्टिनेशन आहे.