कोणत्याही फळांचे वेफर्स बनवा व महिन्याला 1 लाख रुपये कमवा, जाणून घ्या एकदम सोपी Business Idea

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 Business Idea : आजकाल अनेक तरुण स्टार्टअप सुरु करण्याकडे लक्ष देऊन आहेत. बिझनेसची ताकद अनेकांच्या लक्षात आली आहे. गावातील असो किंवा शहरातील तरुण असो आजकाल व्यवसाय करण्याकडे कल दिसतो.

सोशल मीडियाच्या माध्यमातून जरी आपण पाहिजे तर अनके लोक बिझनेसविषयी बोलताना विचारताना दिसतात. परंतु अनेकांना बिझनेस करण्याची आवड आहे परंतु त्यांना बिझनेस काय करावा हेच सुचत नाही.

त्यांसाठी आज आम्ही खास बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत. याचे नाव आहे फळांपासून, भाज्यांपासून वेफर्स बनवणे. कितीही मंदी आली तरी हा बिझनेस मात्र जोरात सुरु राहतो. चला या बद्दल जाणून घेऊयात..

सध्या सरकार देखील लोकांना आत्मनिर्भर करण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. तुम्ही विविध योजनांचा लाभ घेऊन बाजारात एंट्री करू शकता. विशेष म्हणजे अजून तरी मोठं मोठ्या कंपन्या यात आलेल्या नाहीत.

त्यामुळे यामध्ये तुम्हाला जास्त स्पर्धेला सामोरे जावे लागणार नाही. तुम्ही स्थानिक मार्केट जरी पकडले तरी तुम्ही सक्सेस व्हाल.

* बिझनेसविषयी थोडेसे

वेफर्स बनवायचा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला थोडी तयारीही करावी लागेल. याचे कारण याला अनेक मशिन्स, किंवा पदार्थांची गरज पडणार आहे. तुम्हाला यासाठी सुरवातीला ज्याची वेफर्स बनवायचे आहेत ती फळे लागतील. उदा. केळी, बटाटा आदी.

सोबतच मीठ, मसाले, खाद्यतेल आदींची गरज पडेल. वेफर्स बनवण्यासाठी आवश्यक मशीन्स लागतील. की ज्यामध्ये तुम्ही फळे धुवू शकता, सोलू शकता किंवा कापू शकता. तुमच्या गरजेनुसार तुम्हाला मशीन आणावी लागेल.

त्यानंतर तयार झालेला माल पॅक करण्यासाठी पाऊच लागतील. अशा पद्धतीने थोडासा अभ्यास करून गरजेनुसार मशीन खरेदी करा.

* सहजासहजी एक लाखांची कमाई

या व्यवसायातून तुम्ही महिन्याला 60 हजार ते 1 लाख रुपये सहज कमावू शकता. असे गृहीत धरा की तुम्ही 100 किलो वेफर्स तयार केले. आता हे करण्यासाठी तुम्हाला 5 ते 7 हजार रुपये खर्च येईल.

बाजारात साधारण 150 रुपये किलो प्रमाणे वेफर्स विकले जातात. म्हणजेच तुम्हाला सुमारे 15 हजार रुपये मिळतील. 7 हजार रुपयांचा खर्च वजा केला तर तर तुम्ही 8 हजार रुपये नफा कमवू शकता. तुम्ही केवळ 40 ते 60 किलो वेफर्स जरी बनवले तरी तुम्ही अडीच हजारांपर्यंत नफा कमाऊ शकता.