Marathi News : स्वर्गाला अल निनोची झळ..!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Marathi News : बर्फवृष्टी आणि काश्मीर यांचे अतूट नाते आहे, बर्फवृष्टीच्या काळात काश्मीरचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत असल्याने काश्मीरला जमिनीवरचा स्वर्गही म्हटले जाते. त्यामुळे दरवर्षी डिसेंबर-जानेवारीमध्ये सोनमर्ग,

गुलमर्ग, तंगमार्ग आणि दक्षिणेकडील अरू व्हॅली हिवाळ्यात यासारखी प्रमुख पर्यटन स्थळे पयर्टकांनी गजबजून जातात. परंतु काश्मीरच्या सौंदर्याला यावर्षी अल निनोची झळ बसली आहे. युरोपियन स्पेस एजन्सीने (ईएसए) उपग्रहांच्या माध्यमातून टिपलेल्या छायाचित्रांतून काश्मीरमध्ये यंदा दरवर्षीपप्रमाणे बर्फवृष्टी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे पर्यटकांचीही निराशा झाली आहे. काश्मीरमध्ये जानेवारी महिन्यात पर्यटकांची गर्दी होती. येथील गुरेझ व्हॅलीचा रस्ता दरवर्षी बर्फाने झाकलेला असायचा, त्यामुळे ऑक्टोबरपासून हा रस्ता बंद होता, पण यावेळी काही वेगळेच पाहायला मिळत आहे. हा रस्ता अजूनही ८५ किलोमीटर खुला आहे, कारण येथे अद्याप बर्फवृष्टी झालेली नाही.

हवामान तज्ज्ञांच्या मते, संपूर्ण डिसेंबरमध्ये काश्मीरमध्ये केवळ २१ टक्के पाऊस झाला असून १५ जानेवारीपर्यंत बर्फवृष्टी होणार नसल्याचेही सांगण्यात येत आहे. या बदलाबाबत भारतीय हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरमधील या मोठ्या बदलाचे कारण अल निनो आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे हवामान बदलले असून भारतातील वेस्टर्न डिस्टर्बन्स कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम काश्मीरातील बर्फवृष्टीवरही झाला आहे.