स्पेशल

प्रतीक्षा संपली ! मारुती सुझुकीचे डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर, कशी राहिली आकडेवारी ? शेअरची स्थिती कशी आहे ?

Published by
Tejas B Shelar

Maruti Suzuki Q3 Results : मारुती सुझुकी, देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी. ऑटो क्षेत्रात या कंपनीने मोठी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. दरम्यान दिग्गज ऑटो कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडच्या Q3 रिझल्ट कडे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे मोठे बारीक लक्ष होते.

अखेर कार आज या कंपनीने ऑक्टोबर-डिसेंबरच्या तिमाहीचा (Q 3) निकाल जाहीर केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गुंतवणूकदारांच्या माध्यमातून कंपनीचा तिमाही निकाल कधी जाहीर होणार असा सवाल उपस्थित केला जात होता.

अखेर कार आज या कंपनीचे तिमाही निकाल समोर आले आहेत. या डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीचा स्टँडअलोन निव्वळ नफा वार्षिक आधारावर 13 टक्क्यांनी वाढून 3,525 कोटी रुपये झाला आहे. या व्यतिरिक्त, कंपनीचे उत्पन्न YoY बेसिसवर 15.6% ने वाढून 38,492 कोटी रुपये झाले.

दुसरीकडे, जर आपण EBITDA बद्दल बोललो तर डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीच्या EBITDA 14% वाढून 4470 कोटी रुपये राहिला आणि EBITDA मार्जिनमध्ये घसरण पाहायला मिळाली. EBITDA मार्जिन 11.7% वरून 11.6% पर्यंत खाली आलाय.

मारुती सुझुकीने या तिमाहीत किती वाहने विकली

दिग्गज ऑटो कंपनीने तिमाही निकाल जाहीर करतांना सांगितले की, कंपनीने डिसेंबरच्या तिमाहीत 566,213 वाहने विकली आहेत. पण एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीने 501,207 युनिट इतके वाहने विकली होती.

यापैकी कंपनीने क्यू 3 दरम्यान भारतात 466,993 वाहने विकली, जी एका वर्षापूर्वी 429,422 युनिट इतकी होती. कंपनीने म्हटले आहे की, त्यांनी क्यू 3 मध्ये 99,220 वाहने निर्यात केली आहेत, जी आतापर्यंतच्या कोणत्याही तिमाहीतील सर्वाधिक आहेत.

एका वर्षापूर्वीच्या याच तिमाही कालावधीत, कंपनीने 71,785 युनिट्सची निर्यात केली होती. कंपनीने पुढे म्हटले आहे की, डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीची निव्वळ विक्री 368,020 दशलक्ष रुपये राहिली, जी एका वर्षापूर्वी 318,600 दशलक्ष रुपये एवढी होती.

मारुती सुझुकीच्या शेअरची सध्याची किंमत काय आहे?

कंपनीचा तिमाही निकाल नुकताच जाहीर झाला आहे आणि निकाल जाहीर होत असतानाच कंपनीचे शेअर घसरले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मारुती सुझुकी कंपनीचा स्टॉक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर म्हणजेच बीएसई सेन्सेक्स वर दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी 1.08 % म्हणजे 131.05 रुपयांनी कमी होऊन 11991.85 रुपयांवर ट्रेड करत होता. तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे NSE निफ्टी वर 1.07% म्हणजे 129.95 रुपयांनी घसरून 11993.80 रुपयांवर ट्रेड करत होता.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar