स्पेशल

मारुती सुझुकीचे ‘या’ एसयूव्ही कारचे लिमिटेड एडिशन दिवाळीत कार मार्केट करणार जाम! वाचा असलेले भन्नाट वैशिष्ट्ये आणि किंमत

Published by
Ajay Patil

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आता अनेक बाईक्स आणि कार उत्पादक कंपन्यांनी वेगवेगळी मॉडेल्स बाजारपेठेत लॉन्च केली असून कालावधीत बाईक किंवा कार खरेदी करणाऱ्यांना भरपूर प्रमाणामध्ये आता पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना बजेट पाहून चांगली वैशिष्ट्य असलेली बाईक्स किंवा कार खरेदी करता येणार आहेत.

तसेच काही कंपन्यांनी काही कारचे अपडेटेड एडिशन लाँच करून ग्राहकांसाठी उत्तम असे पर्याय निर्माण करून दिले आहेतच परंतु ग्राहक आकर्षित कसे होतील याचा देखील पूर्ण विचार या निमित्ताने केलेला दिसतो.

अगदी याच प्रमाणे देशातील अग्रगण्य असलेली कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने देखील लोकप्रिय असलेल्या एसयूव्ही ग्रँड विटाराची नवीन डोमिनियम एडिशन लॉन्च केलेली असून या लिमिटेड एडिशनच्या मॉडेलमध्ये आतील व बाहेरील बाजू आकर्षक आणि आरामदायी अशी बनवली आहे.

या नवीन एडिशन मध्ये कंपनीने साईड स्टेप्स, रियर स्किड प्लेट, बॉडी साइड मोल्डिंग सारखे अनेक फीचर्स ऍड केले आहेत. हे डोमिनियन एडिशन ग्रँड विटाराच्या डेल्टा तसेच झेटा आणि अल्फामध्ये उपलब्ध असून तिन्ही वेरियंटवर वेगवेगळ्या किमतींचे ॲक्सेसरी पॅकेज देखील मिळणार आहेत.

 मारुती ग्रँड विटाराच्या अल्फा व्हेरिएंट मध्ये आहेत सर्वात जास्त फीचर्स

मारुती सुझुकी ग्रँड विटारा डोमिनियन एडिशन मधील जे काही अल्फा व्हेरियंट आहे त्याच्या कॉम्प्लिमेंटरी पॅकेजेची किंमत 52 हजार 699 इतकी असून या व्हेरियंटमध्ये क्रोमड फ्रंट बंपर एक्सटेंडर, ब्लॅक आणि क्रोम रियर स्कीड प्लेट,

प्रीमियम बॉडी कव्हर तसेच कार केअर किट, प्रीमियम डोअर वायजर, फ्रंट स्कीड गार्निश, ब्लॅक गार्निश केलेले हेडलॅम्प तसेच क्रोम बॉडी साइड मोल्डिंग, क्रोम बॅक डोअर गार्निश,

ऑल वेदर थ्रीडी मॅट्स, इंटिरियर स्टायलिंग किट, ब्लॅक नेक्सा कुशन्स, डोअर सील गार्ड, रंग शील लोडिंग प्रोटेक्शन आणि थ्रीडी बूट मॅट यासारखे अनेक फीचर्स ॲड करण्यात आले आहेत.

 या डोमिनियन एडिशनच्या अल्फा आणि झेटा व्हेरियंटमधील वैशिष्ट्ये

मारुती सुझुकी ग्रंड विटारा डोमिनियन एडिशनच्या अल्फा व्हेरियंटमध्ये जे काही फीचर्स आहेत ते सर्व यांच्यामध्ये देखील आहेत. फक्त साईड स्टेप्स दिलेल्या नाहीत व तपकिरी रंगाचे फिनिश केलेले प्रीमियम सीट कव्हर आहे.

या वेरियंटच्या ॲक्सेसरी पॅकेजेची किंमत 49 हजार 999 रुपये आहे. तसेच मारुती सुझुकी ग्रँड विटारा डोमिनियन एडिशनच्या झेटा व्हेरियंटमध्ये ट्रीम साईड स्टेप आणि ब्राऊन फिनिशिंगचे  प्रीमियम सीट कव्हर देण्यात आलेले नाहीत.

परंतु यामध्ये एनिग्नेटिक लाईनसह डुएल टोन सीट कव्हर दिले आहेत. जेटा व्हेरिएंटाच्या ॲक्सेसरीज पॅकेजेची किंमत 48,599 आहे. विशेष म्हणजे सनासुदीच्या काळामध्ये ग्राहकांना मारुती सुझुकी ग्रँड विटारावर एक लाख पर्यंतची बचत देखील करता येणार आहे.

Ajay Patil