स्पेशल

मारुतीच्या ‘या’ कारने स्कार्पिओला दिली धोबीपछाड! विक्रीमध्ये राहिली अव्वल; कमी किमतीत देते 26 किलोमीटरचे मायलेज आणि बरेच काही

Published by
Ajay Patil

भारतीय कार बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून बघितले तर भारतामध्ये महिंद्रा आणि मारुती सुझुकीच्या कार मोठ्या प्रमाणावर विकल्या जातात व विक्री होण्याच्या बाबतीत देखील या दोन्ही कंपन्यांच्या कारमध्ये आपल्याला स्पर्धा दिसून येते. भारतीय ग्राहक हे मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या कंपन्यांच्या सात सीटर कार खरेदी करण्याचा प्राधान्य देतात.

जर आपण गेल्या महिन्यातील म्हणजे जुलै 2024 मधील टॉप 10 कारमध्ये होणारी  विक्री पाहिली तर यामध्ये काही सात सीटर कारने आपले स्थान बळकट केल्याचे चित्र आहे. यामध्ये प्रामुख्याने स्पर्धा ही मारुती सुझुकीची इको तसेच मारुती सुझुकी एर्टिगा आणि महिंद्राच्या स्कार्पिओ या कारमध्ये दिसून आली.

परंतु मारुती सुझुकीच्या एर्टिगाने महिंद्राच्या स्कार्पियोला विक्रीच्या बाबतीत देखील मागच्या महिन्यात धोबीपछाड दिली. मारुती सुझुकी एर्टीगाने या कालावधीत 9.40% वार्षिक वाढीसह एकूण पंधरा हजार सातशे एक कारची विक्री झाली तर  याच कालावधीत 12,237 स्कॉर्पिओ कारची विक्री झाली.

यावरून आपल्याला दिसून येते की,सात सीटर कार मध्ये ग्राहकांनी मारुती सुझुकी एर्टिगाला पसंती दिली. या कारमध्ये नेमके काय वैशिष्ट्ये आहेत व तिची किंमत काय आहे? याबद्दलची माहिती आपण या लेखात बघू.

 कसे आहे मारुती सुझुकी एर्टीगाची वैशिष्ट्ये आणि इंजिन?

मारुती सुझुकी एर्टिगामध्ये सौम्य हायब्रीड तंत्रज्ञान वापरले असून त्यासह या कारमध्ये 1.5- लिटर ड्युअल पेट्रोल इंजिन आहे. या कारचे इंजिन 103 बीएचपीची पावर आणि 136.8 एनएमचा पिक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच मारुती एर्टिगा पेट्रोल मॅन्युअल प्रकारात २०.५१ किलोमीटर पर लिटर मायलेज देते.

तर पेट्रोल ऑटोमॅटिक प्रकारामध्ये 20.3 किलोमीटर पर लिटर आणि सीएनजीमध्ये 26.1 चे मायलेज देते. मारुती ईरटिगा मध्ये सीएनजी पावर ट्रेनचा पर्याय उपलब्ध आहे व ही सीएनजी किटसह 88 बीएचपीची कमाल पावर आणि 121.5 nm चा पिक टॉर्क जनरेट करते.

 कसे आहे या कारची इंटेरियर?

या कारमध्ये सात इंचाची स्मार्ट प्ले टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली असून ते अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले सपोर्ट करते.

याशिवाय क्रूज कंट्रोल व आऊटो एसी तसेच सुरक्षेसाठी कारमध्ये ड्युअल एअरबॅग्स, एबीएस टेक्नॉलॉजी, ब्रेक असिस्ट आणि रियर पार्किंग सेन्सर यासारखी फीचर्स देखील आहेत.

 भारतामध्ये काय आहे मारुती ईर्टीगाची किंमत?

मारुतीच्या या कारची प्रामुख्याने बाजारात टोयोटा इनोव्हा क्रिस्टा आणि महिंद्रा मराझ्झो या कारशी प्रामुख्याने स्पर्धा आहे. भारतामध्ये मारुती एर्टिगाची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत टॉप मॉडेलसाठी 8.69 लाख रुपये ते 13.3 लाख इतकी आहे.

Ajay Patil