आपण एखादी नोकरी किंवा व्यवसाय करण्यास सक्षम असतो अशा वयामध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देणे खूप गरजेचे असते. जेणेकरून जेव्हा आपली वाटचाल आयुष्याच्या उतारवयाच्या दिशेने सुरू होते तेव्हा या दिवसांमध्ये अनेक समस्या निर्माण होतात. कधी कधी त्या कौटुंबिक असतात तर कधीकधी शारीरिक देखील असतात.
त्यामुळे रिटायरमेंट म्हणजेच निवृत्तीनंतर चांगले जीवन जगण्यासाठी स्वतःकडे पैसा असणे खूप गरजेचे असते. त्यामुळे या दृष्टिकोनातून करिअरच्या अगदी सुरुवातीपासूनच गुंतवणूक करणे खूप गरजेचे असते. निवृत्तीनंतरच्या चांगल्या आयुष्यासाठी गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत.
परंतु यामध्ये पीपीएफ व एनपीएस सारख्या सेवानिवृत्तीच्या नियोजनाकरिता उत्तम पर्याय आहे. परंतु जर रिटायरमेंट नंतर शंभर टक्के रक्कम काढायची असेल तर त्याकरिता म्युच्युअल फंडाचे रिटायरमेंट फंड खूप महत्त्वाचे आहेत. या म्युच्युअल फंडांचे रिटायरमेंट फंडामध्ये गुंतवणुकीचे काय फायदे मिळतात हे आपण बघू.
रिटायरमेंट फंड का आहेत फायद्याचे?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या रिटायरमेंट फंड्स मध्ये गुंतवणूक केली तर मिळणारा सरासरी परतावा हा एनपीएस आणि इतर योजनांपेक्षा अधिक चांगला असतो. तसेच हे रिटायरमेंट फंड इक्विटी, डेट आणि रीट इनव्हिटमध्ये गुंतवणूक करतात व पूर्णपणे इक्विटी डायव्हर्सिफाईड किंवा हायब्रीड फंड असतात. तसेच फंडातील गुंतवणूक ही गुंतवणूकदार रिटायर होईपर्यंत लॉक राहते. जर गुंतवणूक सुरू केली व एक ते दोन वर्षांमध्ये रिटायरमेंट असेल तर पाच वर्षापर्यंत रक्कम यामध्ये राहते.
रिटायरमेंट फंड मधून पैसे काढणे असते सोपे
या फंडांचा लॉक इन कालावधी जेव्हा संपतो तेव्हा पैसे काढण्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन यामध्ये नसते. तुम्हाला जर रिटायरमेंट नंतर नियमित उत्पन्न मिळवायचे असेल तर त्याकरिता गुंतवणूकदार पद्धतशीर पैसे काढण्याची योजना निवडू शकतात किंवा एकरकमी देखील पैसे काढू शकतात.
म्युच्युअल फंडाचे रिटायरमेंट फंड कुणासाठी आहेत जास्त फायद्याचे?
तसे पाहायला गेले तर हे रिटायरमेंट फंड सर्व वयोगटांच्या व्यक्तींसाठी फायदेशीर आहेत. फक्त तुम्हाला यामध्ये जर चक्रवाढ व्याजाचा जास्तीचा फायदा मिळवायचा असेल तर लवकर गुंतवणूक सुरू करणे गरजेचे आहे. तसेच दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हे फंड फायद्याचे ठरतात.
जे गुंतवणूकदार बाजारातील चढ उतारासाठी तयार असतात असे गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूक करणे यामध्ये फायद्याचे ठरते. जे लोक रिटायरमेंटच्या अगदी जवळ आहेत असे लोक हायब्रीड रिटायरमेंट फंड यामध्ये निवडू शकतात. जर आपण या रिटायरमेंट फंडांचा परतावा पाहिला तर गेल्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये रिटायरमेंट फंडच्या हायब्रीड योजनांमधून चांगला परतावा मिळाला आहे व हा परतावा इक्विटी योजनांचा राहिला आहे.