Mazagon Dock Share Price : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक कामाचे अपडेट समोर येत आहे. ते म्हणजे माझगाव डॉक कंपनीचा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवू शकतो.
खरे तर, शेअर बाजारातील हा स्टॉक डिफेन्स सेक्टर मधील सर्वाधिक लोकप्रिय अन गुंतवणूकदारांचा विश्वासू स्टॉक. दरम्यान आता हा स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आला असून हा शेअर आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवणार असे संकेत मिळत आहेत.
गुंतवणूकदारांनी या स्टॉकच्या किमती आगामी काळात वाढतील असे सांगितले असून हा स्टॉक खरेदीसाठी सध्याची परिस्थिती अनुकूल असल्याचे म्हटले जात आहे. अशा परिस्थितीत, आज आपण या स्टॉक मध्ये तेजी येण्याचे कारण अन यासाठी शेअर बाजारातील तज्ज्ञांनी काय टार्गेट प्राईज दिली आहे ? याचा आढावा घेणार आहोत.
Mazdock चा स्टॉक अचानक फोकस मध्ये आला असून यामध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. आज, मंगळवार 28 जानेवारी रोजी माझगाव डॉक शिपबिल्डर्स शेअर 3.91 टक्क्यांनी वाढलाय. या स्टॉक ची किंमत ही 2,315.65 रुपयांवर पोहोचली आहे.
या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 2,930 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 897.70 रुपये इतकी होती. दरम्यान, आजच्या तेजीनंतर माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 94,484 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
विशेष बाब अशी की पुढील काही दिवसांमध्ये हा स्टॉक आणखी तेजीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान आता आपण हा स्टॉक तेजीत येण्याचे नेमके कारण काय? आणि यासाठी विश्लेषकांनी काय टार्गेट प्राईज दिले आहे याचा आढावा घेणार आहोत.
माझगाव डॉक कंपनीला सहा नवीन पाणबुड्या बांधण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळणार असल्याची शक्यता आहे. या कंपनीला प्रोजेक्ट 75I अंतर्गत हा कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे. खरेतर एल अँड टी सुद्धा या शर्यतीत होती मात्र टेंडर प्रक्रियेतून ही कंपनी बाहेर पडली आहे.
अटीची पूर्तता न झाल्याने ही कंपनी टेंडर प्रक्रियेतून बाहेर पडले असून याचा फायदा आता माझगाव डॉक कंपनीला होईल आणि हा कॉन्ट्रॅक्ट या कंपनीलाच मिळणार असे म्हटले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे हा कॉन्ट्रॅक्ट जवळपास 43 हजार कोटी रुपयांचा असण्याची शक्यता आहे.
म्हणूनच हा स्टॉक फोकस मध्ये आला आहे. सध्या हा स्टॉक 2315 रुपयांवर ट्रेड करतोय. यामुळे गुंतवणूकदार या पातळीवर हा स्टॉक खरेदी करू शकतात. दरम्यान पुढील दोन-तीन तिमाहीसाठी 2450 रुपये ही पहिली टार्गेट प्राईज राहणार आहे आणि त्यानंतर लॉंग टर्म मध्ये 2800 रुपये इतकी टारगेट प्राईज राहणार आहे.