Mhada Homes Lottery Fraud : आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाचं आपले स्वतःचे हक्काचे घर असावे असे स्वप्न असते. यासाठी आपण अहोरात्र कष्ट करत असतो.
परंतु गेल्या काही दशकात घरांच्या किमती वाढल्या आहेत. यामुळे स्वतः घर तयार करणे म्हणजे खूपच अवघड बाब बनत चालली आहे. या अशा परिस्थितीत अनेकजण म्हाडाच्या परवडणाऱ्या दरातील घरांची आतुरतेने वाट पाहत असतात.
दरम्यान म्हाडा मुंबई मंडळाकडून लवकरच घराची लॉटरी काढली जाणार आहे. अशातच म्हाडा प्राधिकरणाकडून म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्या लोकांसाठी एक अति महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे.
जर तुम्ही देखील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही बातमी विशेष खास आहे. कारण की, म्हाडाने अर्ज नोंदणीसाठी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करावा असं आवाहन केलं आहे.
खरं पाहता सध्या सोशल मीडियामध्ये म्हाडाचे बोधचिन्ह वापरून म्हाडाच्या प्रकल्पांची तसेच किमतीची अवास्तव माहिती प्रसारित केली जात आहे. यामुळे नागरिकांची फसवणूक होण्याची भीती देखील वाढली आहे.
अशा परिस्थितीत म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करायचा असल्यास म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करावा असे प्राधिकरणाने नमूद केले आहे.
हे पण वाचा :- शेवटी निर्णय झालाच ! पुणे रिंगरोडचे काम ‘या’ महिन्यात होणार सुरु; बाधित जमीनदारांच्या मोबदल्यात पण झाली ‘इतकी’ वाढ? पहा…..
सध्या व्हाट्सअप, युट्युब, फेसबुक यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हाडाच्या नावाने बोगस संकेतस्थळे प्रसारित केली जात आहेत. ही अनधिकृत संकेतस्थळे, मुंबई मंडळाच्या येऊ घातलेल्या सोडतीबाबत ”म्हाडा”चे बोधचिन्ह अनधिकृतरित्या वापरुन म्हाडाच्या प्रकल्पांची, त्यांच्या आकारमानाची, किमतींची अवास्तव माहिती प्रसिद्ध करत असल्याची माहिती म्हाडाच्या प्राधिकरणाने दिली आहे.
अशा बनावट वेबसाईटच्या लिंक सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. या लिंकद्वारे नागरिकांची फसवणूक देखील होऊ शकते. यामुळे म्हाडाने कोणतेही व्हाट्सअप ग्रुप तयार केलेले नसल्याचे म्हटले आहे तसेच कोणत्याही संकेतस्थळाला म्हाडाकडून माहिती देण्यात आलेली नसल्याचे यामध्ये सांगितले गेले आहे.
हे पण वाचा :- महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी, 12वी रिजल्टबाबत आताची सर्वात मोठी अपडेट ! केव्हा लागणार निकाल? वाचा….
फसवणूक होऊ नये म्हणून हे काम करा
म्हाडाच्या घर सोडतबाबत Whastapp ग्रुप आलेल्या लिंकवर क्लिक करुन कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये तसेच कोणतेही आर्थिक व्यवहार करू नये.
तसेच म्हाडाच्या सदनिका विक्री सोडतप्रक्रियेत सहभागी होण्याकरिता https://www.mhada.gov.in तसेच https://housing.mhada.gov.in याच म्हाडाच्या अधिकृत संकेत स्थळांचा वापर करावा. असे आवाहन म्हाडा प्राधिकरणाने केले आहे.