Mhada Lottery 2024:- मुंबई किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा आणि सिडको सारख्या गृहनिर्माण संस्था मोलाचे सहकार्य करतात व या संस्थांच्या माध्यमातून घरांकरिता लॉटरी किंवा सोडत काढण्यात येते हे आपल्याला माहिती आहे.
याच पद्धतीने आता म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून तब्बल 2030 घरांसाठी लॉटरीची सगळी प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये विविध उत्पन्न गटांसाठी घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत व त्यासोबत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरांचा देखील समावेश या लॉटरीमध्ये करण्यात आलेला आहे.
परंतु पंतप्रधान आवास योजनेतील घर मिळवायचे असेल तर त्याला त्याच्या अंतर्गत फॉर्म भरावा लागतो व त्याच्या काही अटी व नियम असतात ते आपल्याला माहीत असते खूप गरजेचे आहे.
पंतप्रधान आवास योजनेतील घर मिळवण्यासाठी काय आहेत नियम?
1- यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा नियम असा आहे की अर्जदार किंवा त्याची पती/ पत्नी आणि अविवाहित मुले यांच्या नावावर भारतामध्ये कुठेही पक्के घर नसावे.
2- तसेच या अंतर्गत अर्ज करण्याकरिता नोंदणी असणे किंवा नोंदणी करणे खूप गरजेचे आहे. म्हणजे पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत नोंदणी केली असेल तर नोंदणी क्रमांक अर्ज भरताना नमूद करणे गरजेचे आहे.
परंतु नोंदणी केली नसेल व सोडतीमध्ये जर नाव आले तर त्यानंतर मात्र नोंदणी करणे बंधनकारक आहे. ही नोंदणीची प्रक्रिया मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ स्तरावर जी संस्था नियुक्त केलेली असते त्यांच्या माध्यमातून होते.
3- या नोंदणीकरिता नियमानुसार 550 रुपये शुल्क विजेत्या लाभधारकाला भरणे गरजेचे असते.
4- तसेच एक एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीमध्ये अर्जदाराचे स्वतःचे आणि त्याची पत्नी/ पती यांचे दोघांचे मिळून वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सहा लाख रुपये पेक्षा कमी असावे.
5- समजा अर्जदार व त्याचे पती / पत्नी दोघेजण जर लॉटरीमध्ये यशस्वी झाले तर दोघांपैकी कुठल्याही एकाला सदनिका देय राहील.
6- पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून जर सदनिका मिळाली तर त्या सदनिकांची पुनर्विक्री लाभार्थ्याला त्यास सदनिकेचा ताबा मिळाल्यापासून दहा वर्षे करता येणार नाही.
7- या सोडतीत जे अर्जदार यशस्वी होतील त्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार उत्तर आवश्यक करांचा भरणा करणे बंधनकारक असेल.
8- या अटी व शर्ती व्यतिरिक्त माहिती पुस्तकेमध्ये असलेल्या ज्या काही इतर अटी व शर्ती आहेत त्या यशस्वी अर्जदाराला लागू राहतील.
9- अर्जदार अथवा अर्जदाराचा पती/ पत्नी यांच्या नावावर जर भारतामध्ये कुठेही पक्के घर आहे असे दिसून आल्यास अशा अर्जदाराचे घराचे वितरण कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल आणि भरलेली रक्कम देखील जप्त करण्यात येईल.
10- पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या घरांसाठी अर्जदार, कुटुंबामध्ये पती-पत्नी आणि अविवाहित मुले यांचा समावेश असेल( यामध्ये विवाहित अथवा अविवाहित सज्ञान कमावती व्यक्ती हे स्वतंत्र कुटुंब म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.) तसेच सदनिकांसाठी कुटुंबातील कर्त्या महिलेच्या किंवा कुटुंबातील कर्ता पुरुष आणि महिला यांच्या संयुक्त नावे वितरण करण्यात येईल.