म्हाडाचा बंपर धमाका ! आतापर्यंतची सर्वात मोठी लॉटरी, ‘या’ भागातील 13 हजार घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. म्हाडाच्या एका महत्त्वाच्या विभागीय मंडळाकडून जवळपास 13000 हून अधिक घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे.

Updated on -

Mhada News : मुंबई पुणे नाशिक नगर नागपुर अमरावती यांसारख्या महानगरांमध्ये घर घेणे अलीकडे फारच आव्हानात्मक बनले आहे. घरांच्या किमती दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालत आहेत. यामुळे अनेक जण म्हाडा कडून उपलब्ध होणाऱ्या परवडणाऱ्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात.

म्हाडाकडून आपल्या विविध विभागीय मंडळांच्या माध्यमातून राज्यभरात परवडणारी घरे उपलब्ध करून दिली जातात. दरम्यान म्हाडाच्या अशाच एका महत्त्वाच्या विभागीय मंडळाकडून हजारो घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे.

13 हजाराहून अधिक घरांसाठी लॉटरी

मिळालेल्या माहितीनुसार म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाने जवळपास 13 हजाराहून अधिक घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. कोकण मंडळाकडून मुंबई महानगर प्रदेशातील 13,395 न विकले गेलेले घरं विक्रीसाठी पुन्हा उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

बुक माय होम’ हे नवं पोर्टल

महत्त्वाची बाब अशी की कोकण मंडळाने यासाठी ‘बुक माय होम’ हे नवं पोर्टल सुरू करण्यात आलं असून, अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. ही घरे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेअंतर्गत देण्यात येणार आहेत.

बुक माय होम या नव्या पोर्टलच्या माध्यमातून अर्जदाराला हवं ते घर निवडता येणार आहे. पूर्वी लॉटरीच्या माध्यमातून मिळणारी घरं आता इच्छुक अर्जदारांना रिअल टाइममध्ये पाहता आणि निवडता येणार आहेत.

त्या घरांना ग्राहक मिळतील

यामुळे अर्जदाराला जे घर हव आहे ते मिळेल आणि हेच कारण आहे की आत्तापर्यंत कोकण मंडळातील जी घरी विक्री विना पडून आहेत त्या घरांना ग्राहक मिळतील अशी आशा मंडळाला आहे. यामुळे साहजिकच घर खरेदीच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि गतिशीलता येणार आहे.

त्यामुळे हजारो नागरिकांचे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार असून म्हाडाच्या या योजनेला चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा सुद्धा व्यक्त होताना दिसत आहे.

दरम्यान या घरांसाठी अर्ज प्रक्रिया नुकतीच सुरू झाली असून इच्छुक अर्जदारांना अर्ज करताना आधार कार्ड, पॅन कार्ड आणि स्व-घोषणापत्र यांचे स्कॅन केलेले दस्तऐवज अपलोड करावे लागणार आहेत.

घरं विक्रीसाठी खुली

दरम्यान यां नव्या प्रक्रियेत नोंदणी झाल्यानंतर अर्जदारांना उपलब्ध फ्लॅट्सची यादी बघता येते आणि पसंतीनुसार घर बुक करता येते. या लॉटरी मधील घरांबाबत बोलायचं झालं तर

यात विरार, खोणी, शिरढोण, गोठेघर, भंडार्ली इत्यादी भागातील घरं विक्रीसाठी खुली झाली असून, इच्छुकांनी वेळ न घालवता संधीचा फायदा घ्यावा, असं आवाहन संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!