स्पेशल

विदेशात गाढवाच्या दुधाची किंमत आहे 5 हजार रुपये लिटर! का असते हे दूध इतके महाग? जाणून घ्या कारणे

Published by
Ratnakar Ashok Patil

Milk Rate Of Donkeys:- जगामध्ये आश्चर्य वाटेल अशा काहीतरी गोष्टी असतात की त्या ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर आपल्याला खूप काही वेगळेपण वाटते किंवा ही गोष्ट एकतर खोटी असेल असे वाटते. परंतु बऱ्याचदा अशा गोष्टी या खऱ्या असतात व त्यामागे तशी कारणे देखील असतात.

आता दुधाच्या बाबतीत जर बघितले तर आपल्यासमोर पटकन गायी किंवा म्हशीचे दूध देते व याचे जर एका लिटरचा दर पाहिला तर तो साधारणपणे 50 ते 60 रुपये प्रतिलिटर दरम्यान आहे. परंतु यामध्ये जर आपण गाढविणीच्या दुधाचा दर आपण बघितला तर तो खूपच जास्त आहे.

आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की गाढविणीच्या दुधाची किंमत विदेशामध्ये चक्क पाच हजार रुपये लिटर इतकी आहे.परंतु यामध्ये जर विचार केला तर यामागील जर प्रमुख कारणे बघितली तर या दुधाची असलेली वैशिष्ट्ये कारणीभूत आहेत. त्याचीच माहिती आपण थोडक्यात बघणार आहोत.

गाढविणीचे दूध इतके महाग का असते?
गाढविणीच्या दुधाची किंमत विदेशामध्ये चक्क पाच हजार रुपये लिटर इतकी आहे. यामागे सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे गाढवीण फक्त एका दिवसाला जास्तीत जास्त अर्धा लिटर दूध देते. त्यामुळे या दुधाची उपलब्धता खूपच कमी आहे व त्यामुळेच हे महाग असते.

म्हणजेच गाई किंवा शेळी, मेंढी किंवा म्हशीच्या तुलनेमध्ये गाढवीण खूप कमी दूध देते व त्या दुधाचा उपयोग खूप मोठा आहे. दुसरे म्हणजे गाढविणीचे दूध खूप लवकर खराब होते. म्हणजेच त्याची टिकवणक्षमता खूप कमी आहे. तसेच स्थानिक मार्केटमध्ये देखील इतर दुधासारखी त्याची विक्री होत नाही.

आरोग्याच्या दृष्टिकोनातून फायदा
आरोग्याच्या अनुषंगाने बघितले तर गाढवाच्या दुधामध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे गाय किंवा म्हशीच्या दुधाची ज्या व्यक्तींना ऍलर्जी आहे त्या लोकांसाठी हे दूध खूप फायदेशीर ठरते. तसेच यामध्ये असलेले पोषक घटक रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आणि पेशींना बरे करण्यासाठी मदत करतात.

ब्युटी सप्लिमेंट आणि अँटी-एजिंग उत्पादन बनवण्यासाठी वापर
गाढविणीच्या दुधाचा वापर ब्युटी सप्लिमेंट आणि अँटी एजिंग उत्पादने बनवण्यासाठी केला जातो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गाढवाच्या दुधापासून बनवलेले चीज हे जगातील सर्वात महाग चीज मानले जाते.

उत्तर सर्बीयामध्ये बनवलेल्या या चीजची किंमत एका किलोला 70 हजार रुपयेपर्यंत आहे. त्यामुळे या सर्व कारणांमुळे गाढवाचे दूध हे खूप महाग विकले जाते.

Ratnakar Ashok Patil