Monsoon राजधानी मुंबईतुन कधी परतणार ? आणखी किती दिवस सुरू राहणार परतीचा पाऊस ? हवामान खात्याने सारं काही सांगितलं

राजधानी मुंबईत परतीच्या पावसाचा जोर विजयादशमी पर्यंत अर्थातच दसऱ्यापर्यंत कायम राहणार आहे. दसऱ्यापर्यंत रोज सायंकाळच्या वेळेला मुंबईत पावसाची शक्यता आहे. हवामान अभ्यासक असे म्हणत आहेत की, मुंबई शहर आणि उपनगरात शनिवारसह रविवारी हलक्या पावसाची शक्यता देण्यात आली आहे. येत्या चार दिवसात म्हणजेच ७ ऑक्टोबरदरम्यान परतीचा पाऊस मुंबईत दाखल होण्याची शक्यता बळावली आहे.

Tejas B Shelar
Published:
Monsoon 2024

Monsoon 2024 : मान्सूनचे जून ते सप्टेंबर हे चार महिने संपलेत. मान्सूनचा परतीचा प्रवासही सुरू झालाय. पण दरवर्षी 5 ऑक्टोबरला मुंबईतून परतणारा मान्सून यंदा अजूनही परतलेला नाही. मुंबईत अजून परतीचा पाऊस दाखलचं झालेला झालेला नाही. यामुळे यंदा मान्सून मुंबईतून माघार कधी घेणार? याची उत्सुकता लागली आहे.

त्यांचं झालं असं की, यंदा मान्सूनचा परतीचा प्रवास एक आठवडा उशिराने सुरू झाला आणि महत्त्वाचे म्हणजे एक आठवडा परतीचा मान्सून एकाच ठिकाणी खोळंबला होता. यामुळे परतीचा पाऊस अजूनही गुजरात आणि राजस्थानातच आहे.

आता, जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर हे पावसाळ्याचे चार महिने संपले आहेत. या पावसाळी काळात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात महाराष्ट्रातील जवळपास सर्वच विभागांमध्ये सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. सर्वात जास्त पाऊस मध्य महाराष्ट्र विभागात झाला आहे.

कोकण, मराठवाडा आणि विदर्भात देखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालाय. मुंबईबाबत बोलायचं झालं तर येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांमध्ये ३ हजार ९० मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

अशातच आता भारतीय हवामान खात्यातील तज्ञांनी मुंबईला आणखी किती दिवस परतीच्या पावसाचा जोर राहणार, मुंबई मधून मान्सून कधी पर्यंत माघार घेणार या संदर्भात मोठी अपडेट दिली आहे.

हवामान खात्यातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, राजधानी मुंबईत परतीच्या पावसाचा जोर विजयादशमी पर्यंत अर्थातच दसऱ्यापर्यंत कायम राहणार आहे. दसऱ्यापर्यंत रोज सायंकाळच्या वेळेला मुंबईत पावसाची शक्यता आहे.

हवामान अभ्यासक असे म्हणत आहेत की, मुंबई शहर आणि उपनगरात शनिवारसह रविवारी हलक्या पावसाची शक्यता देण्यात आली आहे. येत्या चार दिवसात म्हणजेच ७ ऑक्टोबरदरम्यान परतीचा पाऊस मुंबईत दाखल होण्याची शक्यता बळावली आहे.

परतीचा पाऊस मुंबईत दाखल झाला की १२ ऑक्टोबरपर्यंत येथे अगदीचं हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे. मग मान्सून मुंबईतून काढता पाय घेणार असे दिसते. म्हणजेच विजयादशमी झाल्यानंतर मान्सून मुंबईतून बाहेर पडणार आहे. एकंदरीत 12 ऑक्टोबर नंतर मान्सून मुंबईला टाटा, बाय-बाय करणार असे दिसते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe