स्पेशल

शेतकऱ्यांनो, पंजाबरावांचा हवामान अंदाज आला….! फेब्रुवारी महिन्यातील ‘या’ तारखेला राज्यात ढगाळ हवामान राहणार, पाऊसही पडणार?

Published by
Ajay Patil

Monsoon News : ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव आपल्या हवामान अंदाजासाठी शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. निश्चितच पंजाब रावांच्या हवामान अंदाजाबाबत हवामान तज्ञांमध्ये दोन मत पाहायला मिळतात. काही तज्ञ पंजाबरावांचा हवामान अंदाज सायंटिफिक नसल्याचे सांगतात.

तर काही लोक दबक्या आवाजात का होईना पंजाबरावांचे समर्थन करतात. मात्र शेतकऱ्यांचा पंजाबरावाच्या हवामान अंदाजावर मोठा गाढा विश्वास आहे. शेतकऱ्यांच्या मते पंजाबरावांचा अंदाज त्यांच्यासाठी फायदेशीर ठरत असून त्यांनी सांगितलेला अंदाज तंतोतंत खरा ठरत असून यामुळे त्यांना शेतीची कामे करताना सोयीचे होते.

यामुळे त्यांच्या शेती पिकांचे नुकसान अलीकडील काही वर्षात कमी झाल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. दरम्यान पंजाबरावांनी काल आपला सुधारित हवामान अंदाज वर्तवला आहे. डख यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार 20 फेब्रुवारीपासून ते 27 फेब्रुवारी पर्यंत राज्यातील हवामान कोरडे राहणार आहे. दिवसा कडक ऊन पडणार असून रात्री मात्र थंडीचा जोर कायम राहणार आहे.

मात्र 28 फेब्रुवारी रोजी वातावरणात मोठा बदल पाहायला मिळणार आहे. 28 फेब्रुवारी आणि एक मार्च रोजी राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामान राहणार असल्याचे मत पंजाबरावांनी व्यक्त केल आहे. निश्चितच ढगाळ हवामान राहणार असल्याने रब्बी हंगामातील पिकांवर याचा विपरीत परिणाम पाहायला मिळू शकतो.

मात्र यादरम्यान राज्यात पाऊस पडणार नसल्याचे पंजाब रावांनी सांगितले आहे. निश्चितच, ढगाळ हवामान राहणार असल्याने रब्बी हंगामातील पिकांवर तसेच भाजीपाला वर्गीय पिकांवर रोगांचे सावट पाहायला मिळू शकते. फळबाग पिकांवरदेखील याचा विपरीत परिणाम पाहायला मिळू शकतो.

यामुळे शेतकऱ्यांनी तज्ञ लोकांचे मार्गदर्शन घेऊन पीक व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रयत्न करणे महत्त्वाचे राहणार आहे. तसेच डखं यांनी हवामानात मोठा काही बदल झाला तर तात्काळ शेतकऱ्यांना सूचना दिल्या जातील असं देखील यावेळी सांगितल आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil