Monsoon News : यावर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास उशिराने सुरू झालाय. तसेच हा परतीचा प्रवास रखडला सुद्धा होता. पण आता गत दोन दिवसांपासून पुन्हा एकदा या प्रवासाला गती मिळाली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत मान्सून आणखी काही राज्यांमधून माघार घेण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून देशाच्या काही भागांतून निघून जाईल.
मात्र, या काळात देशाच्या राष्ट्रीय राजधानीत अर्थातच दिल्लीत पावसाची शक्यता आहे. 5 आणि 6 ऑक्टोबर रोजी येथे हलका रिमझिम पाऊस अपेक्षित आहे. पण, या पावसाने हवामान बदलण्यास सुरुवात होईल. या वेळी हिवाळा लवकर सुरू होऊ शकतो.
या पावसामुळे मान्सूनचे प्रस्थान लांबणार नाही, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. भारतीय हवामान खात्याने मान्सून कोण कोणत्या राज्यांमधून माघार घेऊ शकतो? याबाबतही माहिती दिली.
कोणत्या राज्यांमधून मान्सून माघारी फिरणार
हवामान खात्याच्या मते, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागांतून मान्सून माघार घेऊ शकतो. मान्सूनच्या प्रस्थानामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत कमाल तापमान हे 34.4 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान हे 24.9°c नमूद करण्यात आले आहे.
हे सध्याचे सामान्य तापमान आहे. तसेच, 5 आणि 6 ऑक्टोबरला रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता असली तरी देखील यंदा लवकरच थंडीचे आगमन होणार असे जाहीर केले आहे.
स्कायमेटच्या मते, मान्सूनच्या प्रस्थानासाठी वातावरण तयार झाले आहे. दिल्ली (सफदरजंग) मध्ये गेल्या 11 दिवसांपासून पाऊस नाही. आता तापमान वाढत आहे. ते 35 ते 37 अंशांच्या दरम्यान राहू शकते. त्यामुळे मान्सून माघारीची चिन्हे आहेत.
मान्सून माघारीच्या काळात हलका रिमझिम पाऊस पडणे सामान्य आहे. यावेळीही 4 ते 5 ऑक्टोबरला रिमझिम पावसाची शक्यता आहे. यामुळे आता मान्सूनची माघार लांबणीवर पडणार नाही.
वाऱ्याची दिशा बदलणे, तेजस्वी सूर्यप्रकाश, दुपारची हलकी झुळूक आणि कमी आर्द्रता. मान्सून 25 सप्टेंबरला दिल्लीतून निघतो. मात्र त्याला पाच दिवसांचा विलंब झाला आहे. 2023 मध्ये 30 सप्टेंबर रोजी मान्सून कमी झाला होता.
मान्सूनने माघार घेतल्यानंतर आठवडाभर किंवा दहा दिवस हवामान उष्ण आणि दमट राहील. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत थंडीचा प्रभाव संध्याकाळी आणि रात्री जाणवत नाही तोपर्यंत तेथील हवामान उष्ण आणि दमटच राहणार आहे.
एकंदरीत मान्सूनचा परतीचा प्रवास आता जलद गतीने सुरू झाला असून लवकरच आपल्या राज्यातूनही मान्सून परतणार आहे. तसेच थंडीला सुरुवात होणार आहे.