Monsoon Picnic Spot : पावसाळा सुरु होऊन एका महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. तर काही ठिकाणी अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. सध्या पावसामुळे सर्वत्र निसर्गाचे अद्भुत स्वरूप अनुभवायला मिळत आहे. यामुळे अनेकजण राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी करत आहेत.
पण, या पावसाळ्याच्या सीझनमध्ये काही लोक महाराष्ट्राबाहेर पिकनिकचा प्लॅन बनवत आहेत. जर तुम्हीही असाच प्लॅन बनवत असाल तर आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रबाहेरील पिकनिक स्पॉटची माहिती देणार आहोत. आज आपण दिव-दमण येथील काही लोकप्रिय पिकनिक स्पॉटची माहिती पाहणार आहोत.
दिव-दमणमधील लोकप्रिय पिकनिक स्पॉट
दीव किल्ला : महाराष्ट्राबाहेर पिकनिकचा विषय निघाला की सर्वप्रथम आपल्या डोळ्यापुढे गोव्याचे चित्र येते. पण, ज्यांना गोव्याला जाता येत नसेल ते दिव-दमणला जाऊ शकतात. येथे तुम्ही समुद्रकिनारा लगत असणाऱ्या दिव किल्ल्याला भेट देऊ शकतात. या किल्ल्यावरून सायंकाळी खूपच मनमोहक दृश्य पाहायला मिळते.
घोगला बीच : गोव्याप्रमाणेच दिव-दमण देखील तेथील समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखले जाते. यामुळे जर तुम्ही दिव दमनला भेट दिली तर तेथील समुद्रकिनारे एक्सप्लोर करायला विसरू नका. दिव दमन येथे तुम्हाला अनेक समुद्रकिनारे पाहायला मिळतील यातीलच एक समुद्रकिनारा आहे घोगला बीच. येथे बाराही महिने पर्यटकांची गर्दी असते मात्र पावसाळा सुरू झाला की ही गर्दी आणखी वाढते. यामुळे पावसाळी पिकनिक साठी हा स्पॉट परफेक्ट ठरणार आहे.
जालंधर बीच : जालंधर बीच हा देखील एक लोकप्रिय समुद्रकिनारा आहे. हा बीच दीवपासून अगदीचं हाकेच्या अंतरावर आहे. पावसाळ्यात या ठिकाणी मोठी गर्दी असते. इतरही ऋतूंमध्ये पर्यटकांची येथे वर्दळ पाहायला मिळते. हा समुद्रकिनारा खूपच अथांग आणि शांत आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या परिवारासमवेत किंवा मित्रांसमवेत क्वालिटी टाईम स्पेंड करू शकता.
पाणिकोटा किल्ला : हे देखील दिव येथील एक फेमस डेस्टिनेशन आहे. दीव बेटावरील पाणिकोटा किल्ला ही एक भारावून टाकणारी वास्तू आहे. ही वास्तू पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. तुम्हीही येथे गेल्यावर हा किल्ला नक्कीच एक्सप्लोर केला पाहिजे.
नायडा लेणी : जर तुम्हालाही ऐतिहासिक वास्तू आणि वेरूळ अजिंठा सारख्या ऐतिहासिक लेण्या पाहण्याची आवड असेल तर तुम्ही या ठिकाणी आवर्जून भेट दिली पाहिजे. दिव किल्ल्याजवळ ही लेणी स्थित आहे. येथील अद्भुत दृश्य लाईफ टाईम तुमच्या स्मरणात राहतील.