स्पेशल

‘हे’ आहेत देशातील सर्वात गरीब खासदार; पहा सर्वात कमी संपत्ती असलेल्या खासदारांची यादी !

Published by
Tejas B Shelar

MP Property News : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राजकीय पक्षांनी आणि राजकीय नेत्यांनी आगामी निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केलेली आहे. राजकीय पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काही जागांवर महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये गोंधळ सुरू असल्याने अजून महाराष्ट्रातील सर्वच लोकसभा मतदारसंघातील मविआ आणि महायुतीच्या उमेदवारांची नावे समोर येऊ शकलेली नाहीत.

मात्र लवकरच सर्व राजकीय पक्षांची उमेदवारांची नावे समोर येणार आहेत. दरम्यान ज्यांची नावे राजकीय पक्षांनी जाहीर केली आहेत ते आता कामाला लागले आहेत. जाहीर झालेल्या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे तसेच इच्छुक उमेदवार देखील प्रचाराच्या आखाड्यात आहेत.

यामुळे सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. दरम्यान आता आपण देशातील सर्वात गरीब खासदारांची यादी पाहणार आहोत. खरे तर, शेकडो कोटींची संपत्ती असलेले खासदार तर आहेतच मात्र देशात असेही काही खासदार आहेत ज्यांची संपत्ती अवघी लाखभर आहे.

कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही मात्र देशात असेही खासदार आहेत जे की इतर खासदारांपेक्षा खूपच गरीब आहेत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया देशातील सर्वात कमी संपत्ती असलेल्या खासदारांची यादी. मात्र, ही यादी गेल्या लोकसभा निवडणुकीतुन प्राप्त झालेल्या माहितीनुसार बनवण्यात आलेली आहे.

सर्वात कमी संपत्ती असलेले खासदार खालील प्रमाणे

आंध्रप्रदेश मधील जी माधवी आराकु यांच्याकडे अवघी एक लाख 41 हजार 179 रुपयांची संपत्ती आहे.

चंद्रानी मुर्मू केझर हे ओडिशा मधील खासदार आहेत आणि ते देशातील सर्वात कमी संपत्ती असलेल्या खासदारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे अवघी तीन लाख 40 हजार 580 रुपयाची संपत्ती आहे.

मध्यप्रदेश मधील भोपाळ लोकसभा मतदारसंघातील खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याकडे चार लाख 44 हजार 224 रुपयांची संपत्ती असून ते या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

सिक्कीम राज्यातील सिक्कीम लोकसभा मतदारसंघाचे खासदार इंद्र हँग सुब्बा यांच्याकडे चार लाख 78 हजार 817 रुपयांची संपत्ती असून ते या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत.

त्रिपुरा राज्यातील त्रिपुरा पश्चिम लोकसभा मतदारसंघातील प्रतिमा भौमिक यांच्याकडे सहा लाख 42 हजार 398 रुपयांची संपत्ती असून ते या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत.

ओडिशा राज्यातील अस्का लोकसभा मतदारसंघातील प्रमिला बिसोई हे या यादीत सहाव्या क्रमांकावर असून त्यांच्याकडे सात लाख 32 हजार 470 रुपयांची संपत्ती आहे.

लक्षद्वीप लोकसभा मतदारसंघातील मोहम्मद फैजलं यांच्याकडे नऊ लाख 38 हजार 641 रुपयांची संपत्ती असून ते या यादीत सातव्या क्रमांकावर आहेत.

लडाख लोकसभा मतदारसंघातील तसेरिंग नामग्याल हे या यादीत आठव्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे नऊ लाख 81 हजार 904 हजार रुपयांची संपत्ती आहे.

केरळ राज्यातील अलाथुर लोकसभा मतदारसंघातील राम्या हरिदास यांच्याकडे 11 लाख 52 हजार 816 रुपयांची संपत्ती असून ते या यादीत नवव्या क्रमांकावर आहेत.

ओडिषा राज्यातील कंधमाल लोकसभा मतदारसंघातील अच्युतानंद समंथा हे या यादीत दहाव्या क्रमांकावर आहेत त्यांच्याकडे 12 लाख 44 हजार 722 रुपयांची संपत्ती आहे. 

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com