स्पेशल

MPSC Recruitment 2024: एमपीएससीची तयारी करणाऱ्या पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, ‘या’ पदासाठी राबवली जाणार भरती प्रक्रिया

Published by
Ajay Patil

MPSC Recruitment 2024:-अनेक तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतात व यासाठी रात्रंदिवस अभ्यास तसेच क्लासेस इत्यादी माध्यमातून आपल्याला बरेच विद्यार्थी प्रयत्न करताना दिसून येतात. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून असे तरुण-तरुणी अभ्यास करतात.

अशाच तरुण-तरुणी करिता आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरतीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेली असून विविध पदांकरिता आयोगाकडून भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जर पदवीधर असाल व स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर तुमच्या करिता हा एक  सुवर्णसंधीचा कालावधी आहे.

याचाच भाग म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून समाज कल्याण अधिकारी गट-ब या पदाच्या 22 रिक्त जागांकरिता भरती प्रक्रिया राबवली जाणार असून याकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहेत.

 समाज कल्याण अधिकारी गट पदाच्या एकूण 22 रिक्त जागांसाठी भरती

याबाबत सविस्तर वृत्त असे की,महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात असून पदवीधर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधीच असून त्याचाच भाग म्हणून आयोगाच्या माध्यमातून समाज कल्याण अधिकारी गट ब पदाच्या एकूण 22 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे व याकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकणार आहेत. याकरिता उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

 या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या समाज कल्याण अधिकारी वर्ग ब या पदाच्या 22 रिक्त जागांसाठी जी भरती प्रक्रिया राबवली जात आहे त्याकरिता उमेदवार हा कोणताही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असणे गरजेचे आहे.

 या ठिकाणी करावा लागेल अर्ज?

समाज कल्याण अधिकारी गट ब या पदासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करायचा आहे ते उमेदवार https://mpsc.gov.in/ या आयोगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज सादर करू शकणार आहेत.

 या भरती संबंधी महत्त्वाच्या तारखा नोट करून ठेवा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून समाज कल्याण अधिकारी वर्ग दोन या पदासाठी जी काही भरती प्रक्रिया राबवली जात आहे त्यासाठीची अर्ज प्रक्रिया 24 मे 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे व अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 7 जून 2024 आहे. यामध्ये पात्र व इच्छुक उमेदवारांनी लक्षात घ्यावे की या तारखेनंतर मिळणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

महत्वाचे

या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित उमेदवारांनी भरतीची जाहिरात व्यवस्थित व सविस्तर वाचावी व त्याप्रमाणे अर्ज भरावा व लागणारे आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे.

Ajay Patil