MSRTC Recruitment 2024 : सरकारी नोकरीची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. एस टी महामंडळात नोकरीचे सुवर्णसंधी चालून आली आहे. यामुळे जर तुमचेही सरकारी नोकरीचे स्वप्न असेल तर तुमचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे.
महत्वाचे म्हणजे याची अधिसूचना एसटी महामंडळाने नुकतीच जारी केली आहे. तसेच या भरतीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरतीची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या पद भरतीअंतर्गत कोणत्या पदांची भरती होणार, किती जागांसाठी भरती होणार यासाठी अर्ज कसा करायचा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा आता आपण प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या पदांसाठी होणार भरती
एस टी महामंडळाने जारी केलेल्या जाहिरातीनुसार या पदभरती अंतर्गत सहाय्यक, शिपाई. सुरक्षारक्षक, वायरमन, लिपिक, टंकलेखक या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
किती पदांसाठी होणार भरती
वर नमूद केलेल्या विविध पदाच्या 46 जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
या पदासाठी किमान 12 वी पास, आयटीआय पास आऊट अन पदवीधर उमेदवार पात्र राहणार आहेत. या अंतर्गत नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
अर्ज कुठे करावा लागणार ?
या भरतीसाठी www.rojgar.mahaswayam.gov.in
या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज सादर करता येणार आहे.
नोकरीचे ठिकाण कोणते?
या पदभरती अंतर्गत नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना पुण्यात नोकरी करावी लागणार आहे. या नोकरीसाठी एम्प्लॉयमेंट नोंदणी कार्ड, शैक्षणिक गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र, बँक पासबुक, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि पॅन कार्ड असे महत्त्वाचे कागदपत्र द्यावे लागणार आहे.