15 चा ‘हा’ स्टॉक पोहचला 11,800 रुपयांवर ! 1 लाखाची गुंतवणूक बनली 7.87 कोटींची

आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये घसरण दिसली. मात्र या घसरणीच्या काळातही नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर एक स्टॉक तेजीत राहिला. हिताची एनर्जी इंडिया कंपनीचा स्टॉक आज 2.34 टक्क्यांनी वाढला. तसेच या स्टॉकने गेल्या पाच वर्षांच्या काळात आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

Published on -

Multibagger Stock : शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरे तर, स्टॉक मार्केट विश्लेषकांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंटचा सल्ला दिला जातो. लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यास शेअर मार्केट मधून चांगला परतावा मिळू शकतो असे विश्लेषक नमूद करतात.

महत्त्वाचे म्हणजे स्टॉक मार्केट मधील अनेक स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना लॉंग टर्म मध्ये चांगले रिटर्न सुद्धा दिलेले आहेत. दरम्यान, आज आपण अशा एका स्टॉकची माहिती पाहणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या काही वर्षांमध्ये चांगला परतावा दिला आहे.

या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांची एका लाखाची गुंतवणूक तब्बल 7.87 कोटी रुपयांची बनवली आहे. Hitachi Energy India कंपनीच्या स्टॉकने ही किमया साधली आहे. दरम्यान आज आपण या स्टॉक ची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

काय आहे डिटेल्स?

हिताची एनर्जी इंडिया लिमिटेड कंपनीच्या स्टॉकने गेल्या पाच वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. हा स्टॉक पाच वर्षांपूर्वी नॅशनल स्टॉक एक्सचेंज वर फक्त पंधरा रुपयांवर ट्रेड करत होता.

मात्र सध्या या स्टॉकची किंमत 11,800 रुपयांच्या रेंजमध्ये आहे. म्हणजेच या स्टॉकने गेल्या पाच वर्षांमध्ये 78,556% रिटर्न देण्याची किमया साधली आहे. या स्टॉकने गेल्या पाच वर्षांमध्ये 787 पट रिटर्न दिल्याने गुंतवणूकदारांना यातून चांगली कमाई झाली आहे.

म्हणजेच पाच वर्षांपूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या स्टॉक मध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि ही गुंतवणूक आत्तापर्यंत होल्ड ठेवली आहे त्यांना यातून 7.87 कोटी रुपये मिळाले आहेत.

स्टॉकची शेअर मार्केट मधील सध्याची स्थिती

24 फेब्रुवारी 2025 रोजी शेअर बाजारात घसरण झाली, मात्र आजच्या या घसरणीत सुद्धा या कंपनीचा स्टॉक 2.34 टक्क्यांनी वाढला. आज हा स्टॉक एनएसईवर 11,837.40 रुपयांवर ट्रेड करतोय.

या स्टॉकच्या अलीकडील कामगिरीच्या बाबत बोलायचं झालं तर हिताची एनर्जी इंडियाच्या स्टॉकने काही अस्थिरता अनुभवायला मिळाली आहे. गेल्या सहा महिन्यांत हा स्टॉक 1.22 टक्क्यांनी घसरला आहे, तर गेल्या महिन्यात हा स्टॉक 34.34 टक्क्यांनी वाढला आहे.

तसेच YTD आधारावर, या शेअरची किंमत 15,428.50 वरून प्रति शेअर 11,897 रुपयांवर आली आहे. म्हणजे या काळात त्याचे मूल्य 23 टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे. 11 ऑक्टोबर 2024 रोजी हा स्टॉक 16,534.50 च्या उच्चांकापर्यंत पोहोचला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe