स्पेशल

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! ईस्टर्न फ्रीवे बाबत मुंबई महापालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, वाचा याविषयी सविस्तर

Published by
Ajay Patil

Mumbai Eastern Free Way : गेल्या काही वर्षांपासून राजधानी मुंबईमध्ये तसेच उपनगरात लोकसंख्या वेगाने वाढत आहे. परिणामी वाहनांची संख्या देखील वाढली आहे. यामुळे शहरात वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होत असून याचा परिणाम म्हणून चाकरमान्यांना वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांपासून शहर आणि उपनगरात वेगवेगळी रस्ते विकासाची कामे केली जात आहेत.

याच पार्श्वभूमीवर ईस्टर्न फ्री वे देखील उभारण्यात आला आहे. पूर्व उपनगरात होणारी ट्रॅफिकची समस्या लक्षात घेता हा फ्री वे तयार करण्यात आला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 2010 पर्यंत मुंबईच्या पूर्व उपनगरामधून शहरांमध्ये मंत्रालय विधान भवन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी येण्यासाठी मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना शहरातील सामान्य नागरिकांना करावा लागत होता.

हे पण वाचा :- शिंदे-फडणवीस सरकारचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना ‘थोडी खुशी तो थोडा गम’ देणारा निर्णय; मानधनवाढ दिली पण…

या पार्श्वभूमीवर मग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून 2010 मध्ये पी डि’मेलो रोड ते मानखुर्द गोवंडीदरम्यान जवळपास 17 किमी लांबीचा पूर्व मुक्त मार्ग अर्थातच ईस्टर्न फ्रीवे बांधण्यात आला. यामुळे मात्र पूर्व उपनगरात होणारी वाहतूक कोंडी बऱ्याच अंशी कमी झाली असून याचा नागरिकांना मोठा फायदा होत आहे.

यामुळे पूर्व उपनगरातून मुंबईमध्ये अवघ्या 20 मिनिटात पोहोचणे शक्य मनात आहे. दरम्यान एमएमआरडीएने 2015 मध्ये एस्टर्न फ्रीवे चे देखभालीचे काम मुंबई महापालिकेकडे सुपूर्द केले. मात्र महापालिकेकडे या मार्गाच्या देखभालीचे काम आल्यानंतर मोठ्या प्रमाणात दुरुस्ती झालेली नव्हती. दुरुस्तीचे कामे अत्यावश्यक असताना देखील महापालिकेच्या माध्यमातून दुरुस्ती केली जात नव्हती.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! संपात सामील झालेल्या ‘त्या’ 18 लाख कर्मचाऱ्यांबाबत शिंदे-फडणवीस सरकारने घेतला ‘हा’…

या मार्गावर वडाळा भक्ती पार्क ते म्हैसूर काॅलनी, पांजरापोळपर्यंतच्या पट्ट्यात रस्त्यावरील काँक्रीटचा थर खडबडीत झाला असल्याने नागरिकांना प्रवासादरम्यान त्रास सहन करावा लागत आहे. मात्र आता लवकरच ईस्टर्न फ्री वे ची दुरुस्ती होणार आहे. महापालिका यासाठी 24 कोटी 41 लाख रुपयांचा खर्च करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

निश्चितच ईस्टर्न फ्रीवे ची दुरुस्ती झाली तर पूर्व उपनगरातील नागरिकांना मुंबईमध्ये येताना सध्या ईस्टर्न फ्रीवे वर जो त्रास खराब रस्त्यामुळे होत आहे, तो त्रास काही अंशी कमी होण्यास मदत होईल आणि प्रवास अधिकच गतिमान होईल तसेच आरामदायी प्रवास नागरिकांना करता येणार आहे.

हे पण वाचा :- अहमदनगरच्या ‘त्या’ सरपंचाचा अभिनव उपक्रम! शेतकरी मुलासोबत लग्न करणाऱ्या नववधूला मिळणार ‘इतक्या’…

Ajay Patil

Published by
Ajay Patil