स्पेशल

मोठी बातमी ! मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनला कोकणातील ‘या’ महत्त्वाच्या रेल्वेस्थानकावरही थांबा मिळणार? पहा….

Mumbai Goa Vande Bharat Train : मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोवा येथील मडगाव रेल्वे स्थानकादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाकडून सर्व आवश्यक पूर्वतयारी देखील सुरू करण्यात आली आहे.या मार्गावर नुकतीच वंदे भारत एक्सप्रेसची यशस्वी ट्रायल रन देखील घेण्यात आली आहे. चाचणी दरम्यान या मार्गावरील वंदे भारत ट्रेनने मात्र सहा तास आणि 57 मिनिटात मुंबई ते गोव्याचा प्रवास पूर्ण केला.

विशेष म्हणजे मुंबई ते रत्नागिरी हे अंतर मात्र चार तास आणि 27 मिनिटात पार केले. चाचणीत मुंबई येथील सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून सकाळी ५ वाजून ५३ मिनिटांनी ही ट्रेन मडगाव कडे रवाना झाली आणि सुमारे ७ तासांत या गाडीने हा प्रवास पूर्ण केला. एकंदरीत या वंदे भारत ट्रेनमुळे मुंबई ते गोवा हा प्रवास गतिमान होणार आहे.

हे पण वाचा :- पुढील पाच दिवस पावसाचेच ! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मान्सूनपूर्व पाऊस, हवामान विभागाचा इशारा

प्रवाशांच्या वेळेत होणार बचत

सध्या छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मडगाव दरम्यान वेगवेगळ्या एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जात आहेत. यामध्ये तेजस एक्स्प्रेस CSMT ते मडगाव हे अंतर ८ तास ५० मिनिटात पूर्ण करत आहे. तसेच सुपरफास्ट कोकणकन्या एक्स्प्रेस १० तास ४१ मिनिटात पूर्ण करते.

याशिवाय, जनशताब्दी एक्स्प्रेस ९ तास व मांडवी एक्स्प्रेस १२ तासात सीएसएमटी ते मडगावचा प्रवास पूर्ण करत आहे. वंदे भारत एक्सप्रेसला मात्र सात तासांचा कालावधी लागत आहे. निश्चितच या वंदे भारत ट्रेनने प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे.

केव्हा सुरु होणार ट्रेन?

दरम्यान, मुंबई ते गोव्यादरम्यान 29 मे 2023 रोजी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याची माहिती काही मीडिया रिपोर्ट मधून समोर येत आहे. याबाबत भारतीय रेल्वेकडून कोणतीच अधिकारीक माहिती मात्र समोर आलेली नाही.

हे पण वाचा :- अमेरिकन व्यक्तीच भारतीय शेतकऱ्यांसाठी भन्नाट संशोधन; तयार केला मायक्रो सोलर पंप, कसा होतोय शेतकऱ्यांचा फायदा? पहा…

कुठं मिळणार थांबा

ही ट्रेन केव्हा सुरू होणार याबाबत अद्याप माहिती हाती आलेली नाही. तसेच या ट्रेनला कुठे थांबे राहतील याबाबत देखील भारतीय रेल्वे कडून कोणतीच माहिती पुरविण्यात आलेले नाही. परंतु तत्पूर्वी या मार्गावरील रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून या ट्रेनला मार्गावरील महत्त्वाच्या स्थानकावर थांबा देण्याची मागणी होत आहे.

यामध्ये सावंतवाडी रेल्वे स्थानकावर थांबा देण्याची देखील मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. मात्र सावंतवाडी रेल्वे स्थानकावर ट्रायल दरम्यान वंदे भारत ट्रेनला थांबा देण्यात आलेला नाही. परंतु प्रवाशांच्या माध्यमातून सावंतवाडी या टर्मिनस स्थानकावर वंदे भारत ट्रेनला थांबा मिळाला पाहिजे अशी मागणी जोर करत आहे.

सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग या तालुक्यासाठी सावंतवाडी रेल्वे स्थानक महत्त्वाचे आहे यामुळे या रेल्वे स्थानकावर मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनला थांबा मिळावा अशी मागणी प्रवाशांची आहे. 

हे पण वाचा :- मुंबई, गोवा, कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ दिवशी सुरु होणार Mumbai-Goa वंदे भारत एक्सप्रेस, पहा….

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts