Mumbai Gokhale Bridge Inauguration : मुंबईकरांसाठी एक मोठी महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. शहरात आणि उपनगरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. यामुळे रस्ते सुधारण्याची कामे महापालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आली आहेत. यासोबतच महापालिकेकडून शहरातील धोकादायक पुलांची दुरुस्ती करण्याचे काम तसेच पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे.
नागरिकांचा जीव धोकादायक पुलांमुळे धोक्यात येऊ नये यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील धोकादायक पुलांची पुनर्बांधणी केली जात आहे. यामध्ये गोखले पुलाचा देखील समावेश होतो. हा पूल अंधेरी मधील एक अति महत्त्वाचा उड्डाणपूल आहे.
हे पण वाचा :- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! नवीन आठ ई-शिवाई बस एसटीच्या ताफ्यात दाखल; ‘या’ शहरादरम्यान सुरु होणार सेवा
पूर्व आणि पश्चिम अंधेरीला जोडणारा हा पूल धोकादायक बनला होता यामुळे याचे पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या उड्डाणपुलाला पाडण्याचे काम पश्चिम रेल्वेने केले आहे तर या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून केले जात आहे.
वास्तविक या पुलाचे काम जलद गतीने पूर्ण करून पुढील महिन्यात म्हणजेच मे महिन्यात या पुलाची एक मार्गीका वाहतुकीसाठी सुरू करण्याचे नियोजन होते. पण आता हे नियोजन कोलमडले आहे. म्हणजेच आता या पुलाचा मुहूर्त पुन्हा एकदा हुकला आहे. आता हा पूल पुढील महिन्यात सुरू होणार नसल्याचे सांगितले जात आहे.
हे पण वाचा :- ‘हा’ शेअर ठरला कुबेरचा खजाना ! फक्त 8 वर्षात 1 लाखाचे झालेत 3 कोटी 70 लाख, पहा कोणता आहे तो बाहुबली स्टॉक?
मिळालेल्या माहितीनुसार, या उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक असलेल्या स्टील उपकरणांच्या पुरवठ्यामध्ये अडचण आली असल्याने या पुलाचे काम रखडले आहे. आता स्टीलचा पुरवठा हा एप्रिल अखेर सुरू होईल आणि त्यानंतर मग याचे काम केले जाईल असं मत व्यक्त होत आहे.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या पुलाचे काम आता तब्बल पाच महिने विलंबाने होणार आहे. दिवाळीच्या मध्यापर्यंत म्हणजेच नोव्हेंबर महिन्यापर्यंत या पुलाचे काम पूर्ण होईल अशी माहिती आता दिली जात आहे. एकंदरीत या पुलाचे उद्घाटन आता नोव्हेंबर महिन्यातच होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा :- पुणे, अहमदनगर, नागपूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड अन ‘त्या’ जिल्ह्यात गारपीट होणार ! IMDचा येलो अलर्ट