स्पेशल

मुंबई शहरात तयार होणार आणखी एक नवा मेट्रो मार्ग! पीपीपी मॉडेलवर तयार होणार प्रकल्प, कसा असणार मार्ग? पहा….

Published by
Tejas B Shelar

Mumbai Metro News : मुंबई शहरात आणखी एक नवा मेट्रो मार्ग तयार होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान नवा मेट्रो मार्ग तयार होणार असून हा मेट्रो मार्ग मेट्रोमार्ग आठ म्हणून ओळखला जातोय.

दरम्यान आता याच मेट्रोमार्गासंदर्भात एक नवीन आणि अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे या मेट्रो मार्गाचे काम हे सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर पूर्ण होण्याची शक्यता आहे.

पीपीपी तत्त्वावर या प्रकल्पाचे काम केले जाणार असल्याने याचे कामही अदानी कंपनीकडे जाणार की काय अशा चर्चाही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये रंगल्या आहेत. यामुळे या मेट्रो मार्गाच्या कामावरून वादंग पेटण्याची देखील शक्यता नाकारून चालत नाही.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने सोमवारी एक जीआर काढला, या शासन निर्णयानुसार मेट्रो मार्ग आठ चे काम हे पीपीपी म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्त्वावर केले जाणार आहे.

आता मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ संचालनाचे काम हे अदानी समूहाच्या अदानी एअरपोर्ट्स होल्डिंग लिमिटेड या कंपनीकडे आहे. दुसरीकडे नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीत 74% हिस्सा सुद्धा याच कंपनीचा आहे.

यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या दरम्यान जो मेट्रो मार्ग तयार होईल त्याचे काम अदानी समूहचा आपल्या हाती घेऊ शकते असा दावा होऊ लागला आहे. पण या प्रकल्पाचे काम हे टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच दिले जाणार आहे.

तरीही आता या प्रकल्पाचे काम नेमके कोणाकडे जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान आता आपण हा मेट्रो मार्ग आठ नेमका कसा आहे या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.

कसा राहणार मेट्रो मार्ग 8

मेट्रो मार्ग क्रमांक ८ ला ‘गोल्ड लाईन’ म्हणूनही ओळखले जात आहे. हा मार्ग घाटकोपर ते अंधेरीपर्यंत भूमिगत अन घाटकोपर ते मानखुर्दपर्यंत उन्नत राहणार अशी माहिती समोर आली आहे. या मार्गावर सीवूडपासून नवी मुंबई विमानतळाकडे जाताना साडेआठ किमी लांबीचे वळण सुद्धा प्रस्तावित आहे.

यामुळे या मार्गावर प्रवास करणे खरच खूप रोमांचक राहणार आहे. या प्रकल्पासाठी 15000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गाची लांबी ही अंदाजीत 35 किलोमीटर एवढी राहील. या प्रकल्पाचा डीपीआर हा सिडको कडून तयार होईल अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकल्पाचे काम सिडको आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून पूर्ण होण्याची शक्यता देखील आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar