Mumbai Metro News : पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठे आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मुंबई शहराला आणखी एका मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे. लवकरच मुंबईमधल्या एका मेट्रो मार्गावर वाहतूक सेवा सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सहाजिकच मुंबईकरांचा प्रवास हा आधीच्या तुलनेत सुपरफास्ट होणार आहे.
खरं तर राजधानी मुंबई, सांस्कृतिक राजधानी पुणे आणि उपराजधानी नागपूर येथे गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेट्रोचा पर्याय पुढे आला आहे.
या तिन्ही शहरांमध्ये सध्या मेट्रो सुरू आहे आणि अजूनही विविध मेट्रो मार्गांचे काम केले जात आहे. दरम्यान मुंबई शहरातील मुंबई मेट्रोमार्ग 3 प्रकल्प लवकरच सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या कॉरिडोरच्या पहिल्या टप्प्यावर मेट्रोची एकात्मिक चाचणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.
दरम्यान या पहिल्या टप्प्यावर आता लवकरच संशोधन डिझाईन आणि आरडीएसओची चाचणी घेतली जाणार आहे. ही चाचणी पूर्ण झाली की हा भूमिगत मेट्रो मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टनुसार मुंबई मेट्रोमार्ग तीनचा पहिला टप्पा जुलै 2024 मध्ये मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास मुंबईकरांना भूमिगत मेट्रो मार्गाने जुलै महिन्यात प्रवास करता येणार आहे.
या मेट्रो मार्ग 3 चा पहिला टप्पा म्हणजेच आरे ते बीकेसी दरम्यान गेल्या एका वर्षभरापासून ट्रायल रन सुरू आहे. सिग्नलिंग सिस्टीम, टेलिकम्युनिकेशन, प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर आणि ट्रॅकच्या चाचणीचे काम पूर्ण झाली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
आरे कॉलनीत मेट्रो कारशेड उभारण्याचे कामही जवळपास झाल्यात जमा आहे. यामुळे आता पहिल्या टप्प्यात 9 गाड्यांसह मेट्रो सेवा लवकरच सुरू होणार असे चित्र आहे. या 9 गाड्यांच्या तपासणीचे काम देखील पूर्ण झालेले आहे.
म्हणजे आता फक्त आवश्यक परवानगी घेऊन या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करणे बाकी राहिले आहे. खरे तर हा मेट्रोमार्ग 33 किलोमीटर लांबीचा असून या मार्गांवर एकूण 27 स्थानके आहेत.
यातील पहिला टप्पा हा अरे ते बीकेसी हा असून यावर दहा स्थानके आहेत. बीकेसी, विद्यानगरी, सांताक्रुज, विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका, एमआयडीसी , सिप्झ आणि आरे ही स्थानके पहिल्या टप्प्यातील आहेत.