मोठी बातमी : राजधानी मुंबईत तयार होणार आठवा मेट्रो मार्ग ! ‘या’ भागालाही मिळणार मेट्रोची भेट, पहा रूटमॅप ?

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईला आणखी एक नवा मेट्रो मार्ग मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे हा मेट्रो मार्ग शहरातील एका महत्त्वाच्या टर्मिनससोबत जोडला जाणार आहे.

Published on -

Mumbai Metro News : मुंबई पुणे नागपूर सारख्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून मेट्रो सुरू आहे. राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये मेट्रो सुरू झाल्याने नागरिकांचा प्रवास वेगवान आणि आरामदायी झाला आहे. या संबंधित महानगरांमध्ये सुरू असणाऱ्या मेट्रोला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. अशातच आता देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे मुंबईत एक नवा मेट्रो मार्ग विकसित होणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत आता मेट्रो धावणार आहे. मुंबई शहरातील मेट्रो मार्गांचे जाळे आणखी वाढवण्यासाठी शहरात मेट्रो 8 ही नवीन लाईन प्रस्तावित करण्यात आली असून याअंतर्गत लोकमान्य टिळक टर्मिनस हे सुद्धा मेट्रोच्या नकाशावर येणार आहे.

यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असून त्यांना वेगवान आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ दरम्यान मेट्रोमार्ग आठ तयार केला जाणार असून याच मेट्रो मार्ग 8 चा आराखडा अखेरकार आता तयार झाला आहे. दरम्यान आता सिडको हा आराखडा मंजुरीसाठी पुढे पाठवणार आहे.

सिडको कडून या बाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली की मग केंद्राची मंजुरी मिळेल आणि त्यानंतर मग खऱ्या अर्थाने या मेट्रोमार्गाचे काम सुरू होईल. सिडकोने या मार्गाच्या मूळ आराखड्यात थोडासा बदल केलेला आहे आणि मुंबई मधील एक महत्त्वाचे रेल्वे टर्मिनस या मार्गात ऍड करण्यात आले आहे.

म्हणजेच मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ या दरम्यानचा मेट्रो मार्ग आता लोकमान्य टिळक टर्मिनससोबत जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिडको कडून तयार करण्यात आलेल्या या आराखड्यात लोकमान्य टिळक टर्मिनस मेट्रो स्थानक समाविष्ट करण्यात आले आहे. आता आपण मेट्रो 8 बाबत घेण्यात आलेला नवा निर्णय नेमका काय आहे याबाबत माहिती पाहूया.

काय आहेत डिटेल्स?

आम्ही आपणास सांगू इच्छितो की मेट्रो 8 हा मार्ग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीए आणि सिडको या दोन्ही प्राधिकरणाच्या माध्यमातून संयुक्तपणे विकसित केला जाणार होता. पण जानेवारी 2025 मध्ये एक महत्त्वाचा निर्णय झाला आणि या अंतर्गत हा मेट्रो मार्ग पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजेच सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र, हा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर पूर्ण करताना याच्या आराखड्यासह निविदा प्रक्रिया राबवून प्रकल्पाची उभारणी करण्याची जबाबदारी ही सिडको प्राधिकरणाकडेच सोपविण्यात आली आहे. त्यानुसार आता ‘मेट्रो 8’चा सुधारित आराखडा नुकताच सिडकोने तयार केला आहे. आता आपण हा मेट्रो मार्ग प्रकल्प नेमका कसा असणार याची माहिती जाणून घेऊया.

कसा असणार प्रकल्प?

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमधील मेट्रो मार्गांचे जाळे वाढवण्यासाठी मुंबई विमानतळ ते मानखुर्द असा मेट्रो 8 हा मार्ग तयार होणार आहे. याची लांबी ही जवळपास 11 किलोमीटरची राहणार आहे. तसेच, सिडको मानखुर्द ते नवी मुंबई विमानतळ असा या मार्गाचा विस्तार सुद्धा करणार आहे.

महत्वाची बाब अशी की हा प्रस्तावित करण्यात आलेला मेट्रो मार्ग काही ठिकाणी भुयारी राहणार आहे. घाटकोपर येथील अंधेरी ते इस्टर्न एक्स्प्रेस हायवेपर्यंत हा मेट्रो मार्ग भुयारी राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

घाटकोपर ते मानखुर्द हा मार्ग मात्र उन्नत राहणार आहे. या नव्या प्रस्तावित मेट्रो मार्गामुळे शहरातील काही महत्त्वाच्या भागांना मेट्रोची भेट मिळणार आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News