स्पेशल

मुंबईकरांनो, कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा ‘या’ महिन्यात सुरू होणार; आतापर्यंत 2 मेट्रो मुंबईमध्ये दाखल, तिसरी गाडीही लवकरच येणार, पहा…

Mumbai Metro Railway News : मुंबईमध्ये सध्या मेट्रो मार्गांची कामे जोमात सुरू आहेत. पुढल्या वर्षी राज्यात विधानसभा निवडणुका आहेत तसेच लोकसभा निवडणुका देखील रंगणार आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या मुंबई शहरात वेग-वेगळी विकासाची कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नाचा भाग म्हणून मुंबई मेट्रोचे कामे युद्ध पातळीवर सुरू असून आता कुलाबा-वांद्रे-सीप्झ या अति महत्त्वाच्या मेट्रोमार्गाबाबत एक मोठी अपडेट हाती आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या मेट्रो मार्ग प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजेच आरे ते बीकेसी हा यावर्षीच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. डिसेंबर 2023 पर्यंत या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होईल आणि लगेचच हा पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल अशी माहिती जाणकार लोकांच्या माध्यमातून समोर येत आहे.

हे पण वाचा :- पंजाबरावांचा तातडीचा मॅसेज ! 25 एप्रिल ते 27 एप्रिल राज्यातील ‘या’ भागात गारपीट होणार; आणखी काय म्हटले डख, पहा…

या नुसार आता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोशनने या मार्गाच्या कामाला गती देण्याचे ठरवले आहे. वास्तविक हा पहिला टप्पा सुरू करण्यासाठी आरे येथील कारशेड चे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. यानुसार आता या कार शेडचे काम पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनने हे कार शेड डिसेंबर अखेरपर्यंत सुरू होईल असे नियोजन आखले आहे.

या कारशेड मध्ये जवळपास 31 मेट्रोची क्षमता आहे. पण पहिला टप्पा सुरू करण्यासाठी केवळ 9 मेट्रो आवश्यक आहेत. यापैकी दोन गाड्या मुंबईमध्ये दाखल झाल्या आहेत. आता तिसरी गाडी देखील लवकरच येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही तिसरी गाडी आरे येथील कारशेड मध्ये आणली जाणार असून यापुढील सर्व मेट्रो या कारशेडमध्येच येणार आहेत.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! तुरीच्या दरात विक्रमी वाढ ; आणखी ‘इतके’ वाढणार भाव, पहा काय म्हणताय जाणकार

दरम्यान, आरे येथील कारशेडची एमएमआरसीच्या म्हणजे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका आश्विनी भिडे यांनी पाहणी केली आहे. यामुळे आता लवकरच या मेट्रो मार्गाच्या पहिल्या टप्प्याचा श्री-गणेशा होऊ शकतो याचे हे संकेत असल्याचे सांगितले जात आहे.

जर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने ठेवलेल्या टार्गेट नुसार डिसेंबर 2023 पर्यंत आरे ते बीकेसी हा टप्पा पूर्ण झाला तर निश्चितच मुंबईकरांना या मेट्रो मार्गाचा फायदा होणार आहे. यामुळे मुंबईच्या वैभवात आणखीन भर पडेल आणि वाहतूक व्यवस्था अजूनच सुरळीत होईल असे देखील सांगितले जात आहे.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी खुशखबर ! रखरखत्या उन्हात ‘या’ अतिमहत्वाच्या मेट्रो मार्गावरील फेऱ्या वाढवल्या, आता Metroचा प्रवास होणार अधिक सुसाट

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts