Mumbai Mhada News : मायानगरी तसेच स्वप्ननगरी मुंबईमध्ये गेल्या काही दशकांपासून राज्यातील विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक स्थायिक झाले आहेत. राज्याची राजधानी तसेच देशाची आर्थिक राजधानी असलेले हे कॅपिटल शहर अनेक कंपन्यांच्या हेड ऑफिस साठी ओळखलं जातं.
मुंबईमध्ये विविध शासकीय निमशासकीय विभागांचे मुख्यालये देखील आहेत. यामुळे मुंबईमध्ये कामासाठी आलेल्या चाकरमान्यांची संख्या विशेष उल्लेखनीय आहे. असं म्हणतात की, मुंबईमध्ये जो एकदा जातो तो माघारी फिरत नाही. मायानगरी मुंबईमध्ये असलेली मॅग्नेटिक पावर लोकांना माघारी जाऊच देत नाही. दुसऱ्या जिल्ह्यातून, गावाकडून आलेली लोक मग मुंबईमध्येच सेटल होण्याचे स्वप्न पाहतात.
हे पण वाचा :- ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ विद्यापीठात निघाली भरती, 35 हजार रुपये पगार मिळणार, वाचा….
मात्र हे स्वप्न काही साधं नाही कारण की मुंबईमध्ये घरांच्या किमती या मुंबईमधील उंचच-उंच इमारतींप्रमाणे आहे. अशा परिस्थितीत मग मुंबईमध्ये घर घेऊ इच्छिणारे सर्वसामान्य व्यक्ती म्हाडाच्या सोडतीकडे बारीक लक्ष ठेवून असतात. जसं की आपणास ठाऊकच आहे म्हाडा कडून परवडणाऱ्या दरात नागरिकांना घरांची उपलब्धता करून दिली जाते.
मुंबई मंडळाकडून देखील त्यांच्या क्षेत्रात घरांची उपलब्धता नागरिकांसाठी करून दिली जाते. मात्र 2019 पासून म्हाडाच्या मुंबई मंडळांने घरांची लॉटरी काढलेली नाही. जवळपास चार वर्षांपासून मुंबई मंडळाची लॉटरी निघाली नसल्याने नागरिक आतुरतेने मंडळाच्या घर सोडतीची वाट पाहत आहेत.
हे पण वाचा :- नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! आता सिडको Navi Mumbai मध्ये निओ मेट्रो सुरु करणार, कसा राहणार रूट, पहा…..
दरम्यान आता मुंबई मंडळाच्या घर सोडतीची वाट पाहणाऱ्या तमाम नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मुंबई मंडळाकडून मे महिन्याच्या शेवटी म्हणजेच या चालू महिन्याच्या शेवटी जाहिरात काढली जाणार आहे. येत्या 15 ते 20 दिवसात या लॉटरीची जाहिरात निघणार असून जवळपास साडेतीन हजार घरांसाठी ही जाहिरात निघणार आहे.
जाहिरात जारी झाल्यानंतर संपूर्ण जून महिना अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. यानंतर मग पात्र नागरिकांची प्रारूप यादी आणि अंतिम यादी जाहीर होईल. मग जुलै ते ऑगस्ट महिन्यात या घर सोडतीची प्रत्यक्षात लॉटरी काढली जाणार आहे.
हे पण वाचा :- महाराष्ट्रात रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 3190 जागांसाठी निघाली भरती, 10वी आणि 12वी पास उमेदवार राहणार पात्र, वाचा….
किती घरांसाठी निघणार जाहिरात
म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भात एक मोठी अपडेट दिली आहे. अधिकाऱ्यांच्या मते मुंबईमध्ये म्हाडाने वेगवेगळ्या प्रकल्पावर कामे सुरू केली होती. यापैकी बहुतांशी प्रकल्पांतर्गत घरे अंतिम टप्प्यात आले आहेत. सध्या याची यादी तयार करण्याचे काम सुरु आहे. येत्या आठवड्याभरात मुंबई मंडळ अंतर्गत म्हाडाची किती घरे तयार आहेत याची संपूर्ण यादी समोर येणार आहे.
मात्र जर ढोबळमानाने विचार करायचा झाला तर गोरेगाव प्रकल्पात 2600 घर तयार आहेत. आणि मुंबई मंडळाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या विविध प्रकल्पात आणखी 900 ते 1000 घरे तयार असतील असा अंदाज आहे. अर्थातच ही घर सोडत जवळपास साडेतीन हजार घरांसाठी काढली जाणार आहे.
किती आहे किंमत?
याबाबत म्हाडाकडून कोणतीच अधिकारीक माहिती हाती आलेली नाही. पण काही वरिष्ठ अधिकाऱ्यानी यासंदर्भात मीडियाला अपडेट दिले आहेत. यानुसार EWS घरांच्या किमती जवळपास 25 लाख रुपयांच्या आसपास राहणार आहेत आणि LIG घरांच्या किमती 45 लाखांच्या आसपास राहणार आहेत. किमतीबाबत मात्र अद्याप कोणतीच माहिती हाती आलेली नाही, यामुळे नेमक्या किमती किती राहतात? याबाबत जाणून घेण्यासाठी थोडा काळ वाट पहावी लागणार आहे.
हे पण वाचा :- म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांनो सावधान ! ‘ही’ काळजी घ्या नाहीतर होणार लाखों रुपयांची फसवणूक