Mumbai Nagpur Expressway : समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्प. या प्रकल्पामुळे मुंबई ते नागपूर दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. या प्रकल्पांतर्गत मुंबई ते नागपूर दरम्यान 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग तयार होत असून आत्तापर्यंत या प्रकल्पाचे निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाले असून या महामार्गावरून वाहतूक देखील सुरू आहे.
समृद्धी महामार्गाचा नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सध्या सुरू आहे. सर्वप्रथम या महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला. यानंतर शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला.
या वर्षाच्या सुरुवातीलाच भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झालाय. म्हणजेच आतापर्यंत समृद्धी महामार्गाचे तीन टप्पे वाहतुकीसाठी दाखल झाले असून लवकरच शेवटचा टप्पा देखील सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे.
फेब्रुवारी 2025 मध्ये या महामार्गाचा शेवटचा टप्पा म्हणजेच इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी दाखल होईल अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळामध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून समोर आलेली आहे.
जेव्हा हा संपूर्ण महामार्ग प्रकल्प वाहतुकीसाठी सुरू होईल तेव्हा मुंबई ते नागपूर दरम्यान चा प्रवास अवघ्या आठ तासात पूर्ण होणार असा दावा अधिकाऱ्यांकडून केला जातोयं. समृद्धी महामार्ग प्रकल्पामुळे मराठवाडा, विदर्भासहित पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील एकात्मिक विकासाला चालना मिळालेली आहे.
दरम्यान याच समृद्धी महामार्ग लगत 16 ठिकाणी स्मार्ट सिटी तयार होणार आहे. आज आपण या महामार्ग प्रकल्प अंतर्गत कोणत्या 16 ठिकाणी स्मार्ट सिटी तयार होईल या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
समृद्धी महामार्ग लगत कोणकोणत्या ठिकाणी स्मार्ट सिटी तयार होणार?
समृद्धी महामार्गावर 16 ठिकाणी स्मार्ट सिटी प्रकल्प तयार करण्याच्या हालचालींना आता वेग आला असून येत्या 30 डिसेंबर रोजी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या बाबतीत मुंबईत उच्चस्तरीय बैठक होणार आहे. यामध्ये महामार्गालगत विकसित केल्या जाणाऱ्या स्मार्ट सिटी प्रकल्पासंदर्भात सविस्तर चर्चा होईल.
1- विरुल (चेनेज – 80 ) वर्धा
2 – दत्तपुर ( चेनेज – 105.7) अमरावती
3 – शिवनी ( चेनेज – 137.5) अमरावती
4 – शेह ( चेनेज – 182.5 ) कारंजा वाशिम
5 – वानोज ( चेनेज – 210.5 ) वाशिम
6 – रिधोरा ( चेनेज – 239.6 ) वाशिम
7 – साब्रा ( चेनेज – 283.3) मेहकर बुलढाणा
8 – माळ सावरगाव ( चेनेज – 340) बुलढाणा
9 – जामवाडी ( चेनेज – 365) जालना
10 – हडस पिंपळगाव ( चेनेज -470)
11 – जांबरगाव (चेनेज – 488.5) संभाजीनगर
12 – धोत्रा (चेनेज 505) कोपरगाव, नगर
13 – सावळा विहीर (चेनेज – 520) नगर
14 – फुगाले (चेनेज – 635) ठाणे
15 – सपगाव (चेनेज – 670 ) ठाणे
16- लेणाड (चेनेज – 673) ठाणे