Mumbai Nagpur Railway : नागपूर ते मुंबई आणि मुंबई ते नागपूर रेल्वेमार्गे एक प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन कॅपिटल शहरांदरम्यान रोजाना हजारो नागरिक रेल्वे मार्गे प्रवास करतात.
या मार्गांवर उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये रेल्वे प्रवाशांची संख्या विशेष वाढते. सुट्ट्या सुरू असून यामुळे या मार्गावरील प्रवाशांची संख्या दुप्पट झाली आहे. अशातच आता मुंबई ते नागपूर रेल्वे मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
वास्तविक भारतीय रेल्वेच्या माध्यमातून वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी नॉन-इंटरलॉकिंगचे काम किंवा यार्ड मॉडलिंग किंवा अन्य कामे सुरू असतात.
हे पण वाचा :- खरं काय ! ‘हा’ 2 रुपयाचा स्टॉक 3 वर्षातच बनला 714 रुपयाचा, गुंतवणूकदारांना तीन वर्षातच मिळाला 25,407% परतावा, वाचा….
आता भारतीय रेल्वेने जळगाव ते मनमाड दरम्यान नॉन-इंटरलॉकिंगचे काम हाती घेतले आहे. या कामामुळे मात्र नागपूर ते मुंबई दरम्यान कार्यरत असलेल्या काही एक्सप्रेस गाड्या रद्द होणार आहेत. भुसावळ विभागातील अनेक एक्सप्रेस गाड्या या कामामुळे रद्द होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
जळगाव ते मनमाड दरम्यान घेण्यात आलेल्या या नॉन इंटरलॉकिंग च्या कामामुळे सेवाग्राम एक्सप्रेस देखील रद्द होणार आहे. सेवाग्राम एक्सप्रेस मुंबई ते नागपूर दरम्यान धावणारी एक प्रमुख एक्सप्रेस ट्रेन आहे. आता ही एक्सप्रेस ट्रेन दोन दिवस रद्द राहणार आहे.
हे पण वाचा :- मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग : महामार्गालगत ‘या’ चार ठिकाणी तयार होणार हेलिपॅड, अपघात झाल्यास होणार मोठा फायदा
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या नॉन इंटरलॉकिंग च्या कामामुळे नागपूरहून धावणारी नागपूर मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस 29 मे रोजी रद्द होणार आहे.
तसेच मुंबईहून धावणारी मुंबई नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस 30 मे रोजी रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. साहजिकच रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे या मार्गावरील प्रवाशांना काही काळ अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
29 मे आणि 30 मे रोजी सेवाग्राम एक्सप्रेस रद्द राहणार असल्याने विदर्भातील प्रवाशांना याचा मोठा फटका बसणार आहे. यामुळे ज्या मुंबईकरांना नागपूरकडे प्रवास करायचा असेल त्यांना देखील याचा फटका बसणार आहे.
हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी; भारतीय वायुदलात ‘या’ पदाच्या 276 जागांसाठी होणार भरती, देशसेवेची सुवर्णसंधी ! आजच करा अर्ज