मुंबई अन नाशिक मधील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! सुरु झाली नवीन एक्सप्रेस ट्रेन, ‘या’ 12 Railway स्थानकावर थांबा मंजूर

सध्या संपूर्ण देशभर उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर पण एकदम बाहेर पिकनिकला जात आहेत. तसेच उन्हाळी सुट्ट्यांमुळे काहीजण आपल्या मूळ गावाकडे सुद्धा रवाना होत आहेत. अशातच, आता राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Published on -

Mumbai Nashik Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे, ही बातमी राज्यातील मुंबई आणि नाशिक येथील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे कडून मुंबईकरांसाठी लवकरच एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाने ही नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते.

मुंबईहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील लक्षणीय वाढते आणि याचमुळे प्रशासनाच्या माध्यमातून मुंबई येथे लोकमान्य टिळक टर्मिनस ते सुलतानपूर दरम्यान विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्त्वाची बाब अशी की ही गाडी उत्तर महाराष्ट्रातून चालवली जाणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक रेल्वे स्थानकावर सुद्धा या गाडीला थांबा मंजूर करण्यात आलेला आहे. यामुळे मुंबई सहित उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी देखील ही गाडी मोठी फायद्याची ठरणार आहे.

अशा परिस्थितीत, आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक तसेच ही गाडी कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार ? या संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कस राहणार वेळापत्रक ?

रेल्वेने सांगितल्याप्रमाणे, लोकमान्य टिळक टर्मिनस ते सुलतानपूर यादरम्यान चालवली जाणारी विशेष गाडी (गाडी क्रमांक 04211) 6 मे ते 24 जून 2025 या कालावधीत धावणार आहे. या काळात ही गाडी दर मंगळवारी दुपारी चार वाजून 35 मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनसहून येथून रवाना होणार आहे आणि भुसावळ रेल्वे स्थानकावर ही गाडी मध्यरात्री 12 वाजून 45 मिनिटांनी पोहचणार आहे.

याविषयी गाडीच्या म्हणजेच मुंबई सुलतानपूर विशेष गाडीचे एकूण आठ फेऱ्या होणार आहेत. तसेच सुलतानपूर एलटीटी विशेष ट्रेन म्हणजेच गाडी क्रमांक 04212 ही गाडी पाच मे 2025 ते 23 जून 2025 या कालावधीत चालवले जाणार आहे.

ही गाडी या काळात दर सोमवारी सुलतानपूर रेल्वे स्थानकावरून रवाना होणार आहे. या गाडीमुळे मुंबई ते सुलतानपूर या मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळेल अशी आशा आहे.

कोण – कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार विशेष गाडी ?

सेंट्रल रेल्वेने सांगितल्याप्रमाणे, मुंबई येथे लोकमान्य टिळक टर्मिनस ते सुलतानपूर दरम्यान चालवल्या जाणाऱ्या विशेष एक्सप्रेस ट्रेनला या मार्गांवरील ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, खांडवा, इटारसी,

राणी कमळापती, बिना ज. झासी, ओराई, कानपुर आणि लखनौ या स्थानकांवर थांबा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे या रेल्वे स्थानकावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना विशेष एक्सप्रेस ट्रेनचा मोठा फायदा होणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News