Mumbai News : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात रेल्वे आणि रस्त्याचे विविध प्रकल्प सुरू आहेत, यातील काही प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत तर काही प्रकल्प येत्या काही दिवसात पूर्ण होणार आहेत. मुंबईत सुद्धा असे छोटे मोठे अनेक प्रकल्प सुरू आहेत. दरम्यान आता मुंबईकरांना एका नव्या केबल ब्रिज ची भेट मिळणार आहे.हा नवा ब्रिज दक्षिण मुंबईत तयार होणार असून यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेकडून दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दूर करण्यासाठी महालक्ष्मी रेल्वे स्टेशनजवळील डॉ. इमोसेस रोडवर फ्लायओव्हर अर्थात उड्डाणपुल आणि महालक्ष्मी रेल्वे स्टेशनजवळील केशवराव खाडी रोडवर केबल स्टेड फ्लायओव्हर बांधत आहे.

सध्या या प्रकल्पांचे काम युद्ध पातळीवर सुरू असून आयुक्त अभिजीत बांगर यांनी या प्रकल्पाची नुकतीच पाहणी केली आहे. दरम्यान आता आपण मुंबई तयार होणारे हे दोन ब्रिज नेमके कसे आहेत? या ब्रिजचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार या संदर्भात आयुक्त अभिजीत बांगर यांनी काय माहिती दिली? याच बाबतचा सविस्तर तपशील जाणून घेणार आहोत.
केव्हा पूर्ण होणार काम
बांगर यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, डॉ. इमोसेस रोडवरील फ्लायओव्हर आणि महालक्ष्मी रेल्वे स्टेशनजवळील केशवराव खाडी रोडवरील केबल स्टेड फ्लायओव्हर 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्णपणे तयार होतील आणि वाहतुकीसाठी सुरु होतील.
या अनुषंगाने बीएमसी कडून शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 26 फेब्रुवारी रोजी बांगर यांनी या प्रकल्पाची पाहणी केली आहे. त्यांनी या प्रकल्पाची प्रत्यक्षस्थळी धाव घेऊन पाहणी केली असून या दरम्यान त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सूचना सुद्धा दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे येत्या पावसाळ्यात सुद्धा या प्रकल्पाचे काम थांबायला नको असे त्यांनी यावेळी बजावले आहे.
कसा आहे हा संपूर्ण प्रकल्प?
केशवराव खाडे ब्रिज हा महालक्ष्मीमधील रेल्वे ट्रॅकवरील पहिला ‘केबल स्टेड ब्रिज’ राहणार आहे. हा पूल महालक्ष्मी रेल्वे स्टेशनजवळ महालक्ष्मी मैदानाजवळील सात मार्गांना जोडणार आहे. या पुलाची लांबी 803 मीटर आहे आणि रुंदी 17.2 मीटर आहे. पण, रेल्वे मार्गावरील पुलाची रुंदी 23.01 मीटर आहे.
या व्यतिरिक्त, डॉ. इमोसेस रोडवरील फ्लायओव्हर हा महालक्ष्मी स्टेशनच्या उत्तरेस तयार होतोय. ई मोसेस रोड ते धोबी घाट ते वरळी पर्यंत हा उड्डाणपुल राहणार आहे. याची लांबी 639 मीटर आहे. या कामासाठी जवळपास 250 दिवसांचा वेळ लागणार आहे. अर्थात 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत हे प्रकल्प पूर्ण होणार आहेत.