Mumbai News : मुंबई आणि उपनगरात गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीचा नागरिकांना मोठा फटका बसत आहे. म्हणून नागरिकांना वाहतूक कोंडीतून सोडवण्यासाठी शासनाकडून तसेच प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. ठाणे ते बोरिवली दरम्यान प्रवास करताना देखील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
सध्या ठाणे ते बोरिवली हे अंतर पार करण्यासाठी जवळपास दोन तासाचा कालावधी खर्च करावा लागतो. मात्र आता लवकरच पंधरा मिनिटात पार करता येणार आहे. कारण की आता बोरिवली ते ठाणे दरम्यान लवकरच टनेल रोडचे काम सुरू होणार आहे.
हे पण वाचा :- मुंबई-अहमदाबाद प्रवास आता होणार सुसाट आणि सुरक्षित; Mumbai-Ahmedabad हायवेवर ‘या’ ठिकाणी तयार होणार नवीन भुयारी मार्ग, पहा…..
पश्चिम उपनगर बोरिवलीतील मागाठाणे येथील एकता नगर आणि ठाण्यातील मानपाडा येथील टिकुजी नी वाडी येथे हा टनेल रोड किंवा बोगदा विकसित केला जाणार आहे. या मार्गामुळे बोरिवली ते ठाणे हे अंतर केवळ पंधरा मिनिटात पार होऊ शकते असा दावा केला जात आहे.
शिवाय त्या ठाणे ते बोरिवली प्रवास करताना टोल देखील लागतो. मात्र या बोगद्यामुळे टोल फ्री प्रवास होणार आहे यामुळे वेळेत तर साहजिकच बचत होणार आहे शिवाय पैशांची देखील बचत होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो काळजी घ्या ! ‘या’ जिल्ह्यात कोसळणार अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अलर्ट
कसा असेल हा बोगदा?
बोरिवली ते ठाणे टनेल रोडची लांबी 11.84 किलोमीटर आहे. यामध्ये अंडरग्राउंड टनेल ची म्हणजेच बोगद्याची लांबी 10.8 किलोमीटरची आहे. उर्वरित मार्ग उन्नत रोड आहे. हा एक सहा पदरी मार्ग राहणार आहे.
म्हणजे जाण्यासाठी तीन आणि येण्यासाठी तीन अशा लेन असतील. यासाठी जवळपास आठ हजार नऊशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. निश्चितच या प्रकल्पासाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च करून नागरिकांना वाहतूक कोंडीतून सोडवण्याचा प्रयत्न शासनाकडून होत आहे.
हे पण वाचा :- महिलांसाठी खुशखबर ! शासनाच्या ‘या’ योजनेतून मिळणार 5 लाखांचं विनातारण अन बिनव्याजी कर्ज; कोणत्या महिलांना मिळणार पाच लाख? पहा…
काय आहे प्रकल्पाची सद्यस्थिती?
सध्या या प्रकल्पासाठी टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अद्याप टेंडर उघडण्यात आलेले नाही. मात्र दोन कंपन्यांना या बोगद्याचे टेंडर मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कारण की या कंपन्यांकडून सर्वात कमी बोली लावण्यात आली आहे.
लार्सन अँड टुब्रो अर्थात एलएनटी आणि मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या दोन कंपन्यांना या प्रकल्पाच टेंडर मिळू शकतं असं एका मीडिया रिपोर्ट मधून समोर येत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या प्रकल्पाचे काम दोन पॅकेज मध्ये केले जाणार आहे.
दोन्ही पॅकेजसाठी दोन स्वातंत्र कंपन्या राहणार आहेत. यामुळे या बोगद्याचे काम जलद गतीने पूर्ण होईल आणि लवकरच ठाणे ते बोरिवली हा प्रवास पंधरा मिनिटात पूर्ण होईल असा आशावाद तज्ञ लोकांच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे.