Mumbai Pune Expressway Traffic Alert : राज्याची राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे या दोन्ही शहरा दरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात. विकेंड म्हणजेच शनिवारी रविवारी तर प्रवाशांची संख्या विशेष लक्षणीय असते. वीकेंडला कायमच मुंबई पुणे महामार्गावर गर्दी असते.
यामुळे वाहतूक कोंडी होते आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अशातच काल 14 एप्रिल निमित्त सुट्टी असल्याने सलग तीन दिवस सुट्ट्या आल्या आहेत. यामुळे वीकेंडचा कालावधी वाढला आहे. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात मुंबई पुणे महामार्गावर गर्दी होण्याचे चित्र आहे.
हे पण वाचा :- तरुण शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी; 2 एकर खरबूज पिकातून मिळवले साडेतीन लाखांचे उत्पन्न, पहा ही यशोगाथा
या पार्श्वभूमीवर या चालू शनिवार, रविवारसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आज दुपारी दोन वाजेपासून ते उद्या म्हणजेच रविवार 16 एप्रिल 2023 रात्री 11 वाजेपर्यंत या महामार्गावर काही ठराविक वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. खरं पाहता या वीकेंडला सुट्ट्या अधिक असल्याने या महामार्गावर गर्दी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
लोक अधिक फिरण्यासाठी बाहेर जाणार आहेत. यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. अशातच अवजड वाहने देखील या महामार्गावर आली तर वाहतूक कोंडी आणखीनच वाढू शकते. यामुळे अवजड वाहनांना आज दुपारी दोन वाजेपासून तर उद्या रात्री अकरा वाजेपर्यंत या महामार्गावर बंदी असणार आहे.
तसेच आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणार असून हा सोहळा नवी मुंबईमध्ये पार पडणार आहे. यामुळे या भव्य दिव्य अशा सोहळ्यासाठी राज्यभरातून लोक येण्याची शक्यता आहे. यामुळे महामार्गावर नेहमीपेक्षा अधिक गर्दी राहणार आहे.
हेच कारण आहे की आज 15 एप्रिल 2023 रोजी दुपारी 2 वाजेपासून ते 16 एप्रिल 2023 ला रात्री अकरा वाजेपर्यंत 16 टनपेक्षा जास्त वजन असणाऱ्या अवजड वाहनांना महामार्गावर प्रवेश बंदी केली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे, जुना पुणे मुंबई महामार्ग, मुंबई गोवा महामार्ग आणि नवी मुंबई कडे जाणारे सर्व भागातील रस्त्यांवर हा नियम लागू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हे पण वाचा :- मुंबई ते नागपूरचा प्रवास होणार आणखी जलद ! सुरु होणार नवीन सुपरफास्ट ट्रेन; केव्हा सुरु होणार, ट्रेनला कुठ राहतील थांबे, पहा……