मुंबई-पुणे प्रवासातील 30 मिनिटांचा वेळ वाचणार ! नवीन वर्षात ‘या’ तारखेला सुरू होणार मिसिंग लिंक प्रोजेक्ट, वाचा…

मुंबई-पुणे मिसिंग लिंक हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुढील वर्षी पूर्ण होणार असून यामुळे मुंबई ते पुणे दरम्यानचा प्रवास कालावधी 30 मिनिटांनी कमी होणार आहे. हा महाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी प्रकल्प आहे. दरम्यान याच प्रकल्पाबाबत एक मोठी अपडेट हाती आली आहे.

Tejas B Shelar
Published:
Mumbai Pune Missing Link Project

Mumbai Pune Missing Link Project : 2024 चे वर्ष आता समाप्तीकडे आले आहे. दरम्यान नव्या वर्षात म्हणजे 2025 मध्ये मुंबई ते पुणे दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. मुंबई-पुणे मिसिंग लिंक हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुढील वर्षी पूर्ण होणार असून यामुळे मुंबई ते पुणे दरम्यानचा प्रवास कालावधी 30 मिनिटांनी कमी होणार आहे.

हा महाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी प्रकल्प आहे. दरम्यान याच प्रकल्पाबाबत एक मोठी अपडेट हाती आली आहे. हा प्रकल्प नेमका कधी सुरू होणार या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे. आज आपण याच संदर्भात सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत.

केव्हा सुरू होणार मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्प

मिसिंग लिंक प्रकल्पाचे 95 टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे. खरेतर हा प्रकल्प एम एस आर डी सी कडून विकसित होत असून डिसेंबर 2024 पर्यंत याचे काम पूर्ण होणार होते अन डिसेंबर अखेरीस हा प्रोजेक्ट प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार होता. मात्र, आता नियोजीत वेळेत हा प्रकल्प पूर्ण होणार नाही असे सध्याचे चित्र आहे.

पण, नवीन वर्षात अगदी सुरुवातीलाच या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे. या प्रकल्पासाठी मार्च 2025 पर्यंत डेडलाइन देण्यात आली आहे. म्हणजे या कालावधीपर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार असून प्रत्यक्षात जून 2025 मध्ये मुंबई-पुणे मिसिंग हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी स्वतः ही माहिती दिली आहे.

कसा आहे मिसिंग लिंक प्रकल्प?

आता आपण हा प्रकल्प नेमका कसा आहे हे समजून घेऊयात. या प्रकल्पाच्या माध्यमातून खोपोली एक्झिटपासून ते लोणावळ्याच्या कुसगावपर्यंत दोन्ही दिशेनं प्रत्येकी 4 मार्गिकांचे 2 बोगदे उभारले जात आहेत. यातील सर्वांत मोठा बोगदा 8.87 किलोमीटरचा आहे. तर दुसरा बोगदा 1.67 किमी लांबीचा आहे.

महत्त्वाची बाब अशी की या दोन्ही बोगद्याचे 98 टक्के काम झाले आहे. अर्थातच येत्या काही दिवसात या बोगद्यांचे पूर्ण काम होणार आहे. तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असलेल्या खंडाळा घाटात 180 मीटर उंच स्टेड पुल सुद्धा उभारला जात आहे.

हा संपूर्ण प्रकल्प 14 किलोमीटर चा आहे. या मिसिंग लिंकच्या खंडाळा येथील केबल स्टेड पुलामुळे मुंबईतून पुण्याला जाताना खंडाळा घाट लागणार नाही. फक्त लोणावळ्यात प्रवेश करण्यासाठी या खंडाळा घाटातून जावे लागणार आहे.

हा प्रकल्प जेव्हा पूर्ण होईल तेव्हा मुंबई ते पुणे दरम्यानचे अंतर 6 km ने कमी होणार आहे आणि प्रवासाचा कालावधी तब्बल अर्ध्या तासाने कमी होईल. यामुळे हा पूल कधीपर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार हा मोठा प्रश्न होता.

पण आता एमएसआरडीसी च्या अधिकाऱ्यांनी जून 2025 मध्ये हा प्रकल्प सर्वसामान्यांच्या सेवेत येणार असल्याची मोठी माहिती दिली आहे. यामुळे नवीन वर्ष मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी फारच खास ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe