अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :- गातील इतर देशांप्रमाणेच आफ्रिकन देशांना कोरोनाने जोरदार फटका दिला असतानाच आता एका गूढ आजाराने येथे आपले बस्तान बसवल्याचे समोर आले आहे.
आरोग्य प्रशासनाला चकवा देणाऱ्या या रहस्यमय आजाराचा शोध सुरू करण्यात आला आहे. या गूढ आजाराने आतापर्यंत तब्बल 89 जणांचा जीव घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण सुदानच्या जोंगलेई राज्याच्या उत्तर भागातील शहर फांगकमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे.
या भयंकर परिस्थितीमुळे जागतिक आरोग्य संघटनेच्याही चिंतेत भर पडली आहे जागतिक आरोग्य संघटनेकडून आजारी पडलेल्या व्यक्तींचे नमुने गोळा करून तपासणीसाठी वैज्ञानिकांच्या एका रॅपिड रिस्पॉन्स टीमला या क्षेत्रात धाडण्यात आले आहे.
हा धोका वेळीच ओळखून तपासणीसाठी एक रॅपिड रिस्पॉन्स टीम धाडण्याचा निर्णय जागतिक आरोग्य संघटनेने घेतला आहे. तज्ज्ञांचा हा गट आजारी व्यक्तींचे नमुने गोळा करून त्यावर अभ्यास करेल.
आतापर्यंत जे आकडे समोर आलेत त्यानुसार सुदानमध्ये एकूण 89 मृत्यूंची नोंद करण्यात आली, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य शीला बया यांनी म्हटले आहे.
पुरामुळे उद्भवली परिस्थिती गेल्या काही दिवसांत पूरपरिस्थितीशी झगडणाऱ्या अनेक भागांपैकी हा एक भाग आहे. त्यामुळे, वैज्ञानिकांच्या गटाला एका हेलिकॉप्टरच्या माध्यमातून फांगकमध्ये प्रवेश करावा लागला.
राजधानी जुबाला परतण्यासाठी वाहतुकीच्या साधनांची सध्या ही टीम वाट पाहत आहे, अशी माहितीही शिला यांनी दिली.
जोंगलेईच्या सीमेलगतच्या प्रदेशात भयंकर पूरपरिस्थिती उद्भवल्याने या भागात मलेरियासारखे घातक आजार पसरले जात असल्याचे देशातील भूमी, निवास आणि सार्वजनिक उपयोगिता मंत्री लॅम तुंगवार कुइगवोंग यांनी म्हटले आहे.