Nagpur Ratnagiri Highway : नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाबाबत एक मोठ अपडेट हाती आल आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे नुकत्याच चार ते पाच दिवसांपूर्वी या महामार्गासाठी आवश्यक जमिनीच्या भूसंपादनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील जमीनदारांना मोबदला देणे हेतू 850 कोटी रुपयांचा निधी भूसंपादन विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.
आता या निधीच्या वाटपाबाबत एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा ते चोकाक या दरम्यान हा महामार्ग 74 किलोमीटर लांबीचा राहणार आहे, अन यासाठीचं हा 850 कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की नागपूर रत्नागिरी मार्गाच्या आंबा ते चोकाक चौपदरीकरणासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या त्यांना नुकसान भरपाई गाव निहाय दिली जाणार आहे.
यासाठी विशेष शिबिराचे देखील आयोजन करण्यात आला आहे. दरम्यान, गावनिहाय नुकसान भरपाई वाटप करण्यासाठी तारीख निश्चित झाली असून संबंधित तारखेला संबंधित बाधित शेतकऱ्यांनी त्या गावातील ग्रामपंचायतमध्ये आवश्यक त्या दस्तऐवजासह हजर राहण्याचे आवाहन केले जात आहे.
गावनिहाय या तारखेला होणार नुकसान भरपाईचे वाटप
या महामार्गातील आंबा ते चोकाक दरम्यान जमिनी जाणाऱ्या जमीनदारांना उद्यापासून अर्थातच 26 डिसेंबर पासून मोबदला मिळणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार 26 डिसेंबर रोजी बोरपाडळे (पन्हाळा), आंबवडे (पन्हाळा), पिंपळे तर्फ सातवे (पन्हाळा), दाणेवाडी (पन्हाळा) या गावातील शेतकऱ्यांना मोबदला मिळेल.
तर 27 डिसेंबर रोजी कुशिरे तर्फ ठाणे (पन्हाळा), केर्ली (करवीर), वडगांव (हातकणंगले), चोकाक (हातकणंगले) गावातील शेतकरी बांधवांना जमिनीच्या मोबदल्यात पैसे मिळणार आहेत.
तसेच 28 डिसेंबरला चांदोली (शाहुवाडी), वारुळ (शाहुवाडी), निळे (शाहुवाडी), आंबा (शाहुवाडी) या बाधित गावातील शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा मोबदला मिळणार आहे.
तसेच 29 डिसेंबर रोजी चरण (शाहुवाडी), डोणोली (शाहूवाडी), आवळी (पन्हाळा), पैजारवाडी (पन्हाळा) गावात शिबिर लावून मोबदला दिला जाणार आहे.
30 डिसेंबर रोजी नागांव (हातकणंगले), माले (हातकणंगले), टोप (हातकणंगले) हेर्ले (हातकणंगले) या गावातील बाधितांना मोबदला मिळेल.
31 डिसेंबरला पडवळवाडी (करवीर), केर्ले (करवीर), निगवे दुमाला (करवीर), जाठारवाडी (करवीर) या गावातील शेतकऱ्यांना मोबदला दिला जाईल.
2 जानेवारीला करुंगळे (शाहुवाडी), येलूर (शाहुवाडी), जाधववाडी (शाहुवाडी), पेरीड (शाहूवाडी) या गावातील शेतकऱ्यांना मोबदला मिळेल.
3 जानेवारीला भैरेवाडी (शाहुवाडी), गोगवे (शाहुवाडी), ठमकेवाडी (शाहुवाडी), बांबवडे (शाहूवाडी) या गावातील महामार्गासाठी जमिनी गेलेल्या बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळणार आहे.
आणि शेवटी 4 जानेवारी रोजी चनवाड (शाहुवाडी), कोपार्डे (शाहुवाडी), केर्ले (शाहुवाडी), तळवडे (शाहुवाडी) या गावातील बाधितांना मोबदला देण्याचे प्रस्तावित आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की नागपूर ते रत्नागिरी या महामार्गासाठी एकूण चार टप्प्यात जमिनीचे संपादन झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आंबा ते पैजारवाडी व पैजारवाडी ते चौकाक अशा दोन टप्प्यात जमिनीचे भूसंपादन पूर्णत्वास आले आहे.
पहिल्या टप्प्यात 457 हेक्टर जमिनीचे भूसंपादन होईल तर दुसऱ्या टप्प्यात 152 हेक्टर जमीन महामार्गासाठी ताब्यात घेण्यात येणार आहे. यापैकी जवळपास 96 टक्के जमिनीचे भूसंपादन झाले आहे. दरम्यान पहिल्या टप्प्यासाठी जमिनीच्या मोबदल्यात पैशांचे वितरण झाले आहे. मात्र नंतर निधी उपलब्ध नसल्याने हे काम रखडले.
आता 850 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. आंबा ते पैजारवाडी 417 कोटी आणि पैजारवाडी ते चोकाक 435 कोटी रुपयांचा निधी संबंधित बाधित शेतकऱ्यांना मिळणार आहे. निश्चितच गेल्या काही दिवसांपासून जमीनदार पैसे वेळेवर मिळत नसल्याने चिंताग्रस्त होते.
मात्र निधीची उपलब्धता झाली असल्याने आणि आता मोबदला मिळण्याची तारीख देखील फिक्स झाली असल्याने बाधित शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे.