Weather Update : सध्या राज्यात हवामानात मोठा बदल होत आहे. राज्यातील बहुतांशी भागात अवकाळी पाऊस सुरू आहे. 4 मार्चपासून राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून मध्यंतरी दोन-तीन दिवस उघडीपं राहिल्यानंतर पुन्हा एकदा 14 मार्चपासून राज्यात पाऊस सुरू झाला आहे. विशेष म्हणजे काल आणि परवा राज्यातील बहुतांशी भागात गारपीट देखील झाली आहे.
हे पण वाचा :- ब्रेकिंग! राज्य कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक; संपात सामील झालेल्या ‘त्या’ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश निर्गमित
धुळे, नाशिक जिल्ह्यातील काही भागात गारपीट झाली असल्याने काढणीयोग्य रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने आज देखील राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज नाशिक जिल्ह्यातील काही भागात मात्र पावसाची उघडीपं पाहे. तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान मात्र पहावयास मिळत आहे.
असे असले तरी आज हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. विशेष म्हणजे आज विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि पावसाची शक्यता आहे. यामुळे विज पडण्याच्या घटना घडू शकतात. परिणामी शेतकऱ्यांना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
आपल पशुधन शेतकऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी बांधणे गरजेचे आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान आणि उत्तर गुजरातमध्ये चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होत आहे. या चक्रीय वादळ परिस्थितीमुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. या पोषक हवामान स्थितीमुळे राज्यात पाऊस सुरू आहे. याचा परिणाम आज (ता. १९) रोजी देखील जाणवणार आहे.
हे पण वाचा :- सातारा, सांगली, कोल्हापूरहुन मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता ‘हे’ दोन दिवस बंद राहणार ‘हा’ मार्ग
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात जोरदार वारे, विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मध्य महाराष्ट्रमधील नाशिक, नगर, मराठवाडामधील हिंगोली, नांदेड, लातूर, विदर्भमधील अकोला, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली असल्याने संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अधिक सतर्क राहून शेतीची कामे करावी लागणार आहेत. विज पडण्याच्या घटना अलीकडे वाढले असल्याने शेतकऱ्यांनी पाऊस सुरू झाल्यानंतर झाडाच्या खाली थांबू नये अस आवाहन केल जात आहे.
हे पण वाचा :- महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के तिकीट सवलत लागू; पण ‘या’ महिलांना मिळणार नाही याचा लाभ, वाचा याविषयी सविस्तर